शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"ओळखपत्र दिसेल असे लावा, विचारणा झाल्यास दाखवा"; सरकारी कार्यालयासाठी निर्देश

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 13, 2023 13:30 IST

अन्यथा कारवाई : शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य

सिंदखेडराजा : प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळील ओळखपत्र अभ्यागतांना दिसेल असे लावणे व विचारणा झाल्यास ते दाखवणे अनिवार्य आहे. या संबंधी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व शासकीय कार्यालयांना सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र लावले नाही, तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

याच संदर्भात ७ मे २०१४ रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढले होते. त्यात ओळखपत्र दिसेल, असे लावणे व ओळख पटविण्यासाठी ते विचारणा झाल्यास दाखविणे अनिवार्य केले होते. मात्र या सूचनांची अमलबजावणी होताना दिसत नसल्याने राज्य सरकारने १० ऑक्टोबर रोजी पुन्हा एक परिपत्रक काढले आहे. राज्य सरकारच्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दिसेल, असे लावणे गरजेचे आहे. दरम्यान, ओळखपत्राच्या कारणावरून अनेक ठिकाणी वाद होतात. हे वाद व यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी टाळण्यासाठी सरकारने या सूचना पुन्हा दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांचे ओळखपत्र तपासावे ओळखपत्र दर्शनी भागात नसल्यास त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नाव सबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मासिक अहवाल वरिष्ठांना पाठवावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक शासकीय कार्यालयात पोलीस असतात?प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी असतात असे गृहीत धरून राज्यसरकारने कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय वगळता अन्य कोणत्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस तैनात नसतात. त्यामुळे पोलीस नसलेल्या ठिकाणी ओळखपत्राची ओळखपरेड कोण करणार असा प्रश्न आहे.

सिंदखेडराजात कुठे अंमलबजावणी कुठे कानाडोळाशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य असतानाही या नियमांचे सिंदखेड राजा येथे कुठे अंमबजावणी, तर कुठे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. सिंदखेड राजा येथील तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर पालिका यासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये मोजकेच अधिकारी सध्या ओळखपत्र लावताना दिसून आले.

टॅग्स :Governmentसरकारbuldhanaबुलडाणा