मेहकर तालुक्यामध्ये सरपंचपदाच्या निवडणुका पार पाडल्या आहेत. याकरिता एकूण ९८ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते, तर शुक्रवारी महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती १०, अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग ११ तर सर्वसाधारण करता २३ अशी महिला सरपंचपदाची संख्या आहे. यानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती महिलाकरिता पारडा, शिवाजीनगर, दुर्गबोरी, लोणी, दुधा, जवळा, उसरण, पारखेड, कल्याणा व हिवरा खुर्द, अनुसूचित जमाती महिलाकरिता पिंपळगाव उंडा, बाऱ्हई, आरेगाव, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीवकरिता बदनापूर, भालेगाव, हिवरा साबळे, वागदेव, जानेफळ, अंजनी बु., बोथा, सोनाटी, कंबरखेड, बोरी, ब्रह्मपुरी तर सर्वसाधारण महिलांकरिता अकोला ठाकरे, खंडाळा, घुटी, नायगाव देशमुख, बरटाळा, मोळी, मांडवा स डोंगर, लव्हाळा, वडाळी, वरदडी वैराळ, सोनारगव्हाण, कळंबेश्वर, चायगाव, सावंगी वीर, विवेकानंदनगर, बेलगाव, मोहना खुर्द, मोहना बु., कनका, फैजलापूर, मोळी, मुंदेफळ, शेंदला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
मेहकर तालुक्यातील ४७ गावांमध्ये महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST