दुचाकी रॅलीने महात्मा फुले यांना अभिवादन
By अनिल गवई | Published: April 11, 2024 05:38 PM2024-04-11T17:38:06+5:302024-04-11T17:39:46+5:30
महामानव थोर सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
अनिल गवई, खामगाव ( बुलढाणा ) : महामानव थोर सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समिती २०२४, माळी समाज सेवा मंडळ, माळी समाज युवक संघटनेच्यावतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.
खामगाव येथील महात्मा जोतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या विविध मार्गांवरून मार्गक्रमण करताना या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वामननगरातील माळी भवन येथे ही रॅली पोहोचली. केडीया टर्निंगवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आमदार ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर यांच्यासह राजकीय नेत्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.
विविध मार्गांवरून रॅलीचे मार्गक्रमण-
स्थानिक सामान्य रुग्णालयातून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर शर्मा टर्निंग, टिळक पुतळा, नगरपालिका चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बारादरी, केडिया टर्निंग, भुसावळ चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, केडिया टर्निंग, महावीर चौक, फरशी, एकबोटे चौक, टॉवर चौक, शहर पोलिस स्टेशन, बसस्थानक, संविधान चौक, म्युनिसिपल हायस्कूल समोरून वामन नगरातील माळी भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.