शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Voting Live : ‘आधी मतदान, नंतर लग्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:53 IST

बुलडाणा: लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीकोनातून बुलडाणा लोकसभा मतदार संघातील नवरदेवांचा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे.

बुलडाणा: लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीकोनातून बुलडाणा लोकसभा मतदार संघातील नवरदेवांचा पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे. १८ एप्रिल रोजी लग्न असलेल्या लोकसभा मतदार संघातील आठ नवरदेवांनी मतदानाला महत्त्व देऊन आधी मतदान नंतर लग्नाला गेल्याचे चित्र दिसून आले. सध्या निवडणुकांबरोबरच लग्नाचाही हंगाम जोरात आहे. लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, म्हणून निवडणूक आयोगाने अभिनव उपक्रमही राबविले. उपक्रमाचे फलीत म्हणून बुलडाणा लोकसभा मतदार संघांतील युवकांनी लग्नापेक्षा मतदानाला महत्त्व दिल्याचे उदाहरण सहा ठिकाणी समोर आले आहे. नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला आहे. आठ नवदेवांनी आज लग्नाच्या दिवशी घाईगडबड असतानाही सकाळी मतदान केंद्रावर जात मतदान केले. विशेष म्हणजे मतदान करताना सर्वांनी नवरदेवाचा पोषाख घातला होता. मतदान हे आपले कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने बजावले पाहिजे, असा संदेश या नवरदेवांनी दिला आहे. 

 या नवरदेवांनी केले मतदानमेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील अभिमन्यू वसंतराव देशमुख, बह्मपुरी येथील करण कुरळकर, सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील बाळासाहेब देशमुख, जानेफळ येथील सागर मुरडकर, सावखेड नागरे येथील सचिन जायभाये व हिवरा खु. येथील एका युवकाने लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. तसेच खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील रविंद्र प्रकाश मुºहे व पाळा येथील नवरदेव  दत्ता संजय गावडे याने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणा