शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

 Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:45 IST

बुलडाणा आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीत आणि आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराष्ट्र विधानसभेच्या बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र अताा स्पष्ट होण्यास प्रारंभ झाला असून प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवार हे सात आॅक्टोबर रोजी स्पष्ट होतील. दरम्यान बुलडाणा आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीत आणि आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे.बुलडाण्यात तर ३५ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून वंचित बहुजन आघाडीची कास धरली आहे. दुसरीकडे बुलडाण्यातच भाजपला जागा न सुटल्यामुळे नाराज झालेले योगेंद्र गोडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरीचे निशान फडकवले आहे. या दोघांचाही पवित्रा चांगलाच आक्रमक आहे.दरम्यान जळगाव जामोदमध्ये कांग्रेस उमेदवार स्वाती वाकेकर यांच्या विरोधातच काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रसेनजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर त्यांनी रितसर एक बैठक घेऊन आपल्या बंडाची तिव्रता स्पष्ट केली होती. त्यानुषंगाने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.जळघाव जामोदमध्येच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरीचे झाल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रारंभी येथे शरद बनकर यांच्या रुपाने उमेदवार दिला होता. मात्र दोन दिवसापूर्वी बुलडाण्यात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगितराव भोंगळ पाटील यांनी वंचितमध्ये प्रवेश करत येथील उमेदवारीवर दावा सांगितला होता. तसा उमेदवारी अर्ज त्यांनीही दाखल केला आहे. येथे वंचितकडून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या मतदारसंघात त्यामुळे मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हा कळीचा मुद्दा बनला आहे.एकीकडे काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली असतानाच वंचित बहुजन आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या बंडखोरांना थांबविण्यासाठी आता आघाडी, युती आणि वंचित बहुजन आघाडीचे शिर्षस्थ नेते कोणत्या हालचाली करतात याकडे लक्ष लागून राहले आहे.सात आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्यक्षात या दिवशी जिल्ह्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे बुलडाणा आणि जळगाव जामोदमध्ये झालेली बंडखोरी थांबविण्यासाठीची आशा उभय पक्षांमध्ये आहे.दुसरीकडे मेहकरमध्ये शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर आणि काँग्रेसचे अ‍ॅड. अनंत वानखेडे यांच्या दुरंगी, सिंदखेड राजातही शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यात सरळ लढत आहे तर चिखलीतही भाजपच्या श्वेता महाले विरुद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार राहूल बोंद्रे यांच्यात अतितटीची लढत होत आहे. मलकापुरातही दुहेरी लढतीचे संकेत आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019buldhana-acबुलढाणाjalgaon-jamod-acजळगाव-जामोद