शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 18:36 IST

पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा: महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या एकाही आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिवसेनेत तीव्र नाराजीसह खदखद व्यक्त होत आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये बसूनच मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी बघत या शपथविधी सोहळ््यावर अघोषित बहिष्कार टाकला. पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान सभेतून डॉ. संजय रायमुलकर किंवा विधान परिषदेतून गोपिकिशन बाजोरिया यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांकडे करण्यात आली होती. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, दोन्ही विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विधान परिषदेचे आ. गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया या बड्यानेत्यांसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शपथविधी कार्यक्रमास जाण्याचे टाळले. माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, बुलडाण्याचे विद्यमान शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, वाशिमचे संतोष मापारी, अमरावती व अकोला येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यासह काही तालुका प्रमुखांचा यामध्ये समावेश आहे. आता यासंदर्भात पश्चिम वºहाडातील नेतेमंडळी नेमकी कोणती भूमिका स्वीकारतात याकडे सध्या राजकीय वतुर्ळाचे लक्ष्य लागून आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार असलेले डॉ. संजय रायमुलकर यांनीही लोकमत शी बोलताना त्यास दुजोरा दिला.पश्चिम वºहाडात शिवसेनेचे विधानसभेतील तीन आमदार आहेत. यामध्ये डॉ. संजय रायमुलकर (मेहकर), संजय गायकवाड (बुलडाणा) आणि नितीन देशमुख (बाळापूर) यांचा समावेश आहे. दरम्यान, विधान परिषदेतील आ. गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया यांच्यामध्येही नाराजी असल्याचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रीमंडळातील आपले स्थान निश्चित मानणारे डॉ. संजय रायमुलकर यांनी शपथविधी सोहळ््याच्या दृष्टीने संपूर्ण तयारीही केली होती. मात्र एैनवेळी भ्रमनिराश झाल्याने असंतोष व तीव्र नाराजीची धार संघटनात्मक पातळीवर अधिकच वाढली आहे. दरम्यान, पश्चिम वºहाडात बुलडाणा जिल्'ात शिवसेनेची संघटनात्मक पकड मजबूत असून गेल्या तिस वषार्पासून सातत्याने बुलडाणा जिल्'ातून शिवसेनेचे किमान दोन आमदार निवडून येत आहे. पश्चिम वºहाडाचा विचार करता एकट्या बुलडाणा जिल्'ात शिवसेनेची ताकद ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा ३४ दिवसानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येऊन यात २६ कॅबिनेट व १० राज्यमंत्र्यांना ३० डिसेंबर रोजी शपथ देण्यात आली. मात्र यात नेमक्या पश्चिम विदभार्लाच स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही नाराजी आता अधिक तीव्र स्वरुपात समोर येत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ तर सलग सहा टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात असून प्रत्येक वेळी येथे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि त्यानंतर डॉ. संजय रायमुलकर यांनी विक्रमी मताधिक्यासह विजय मिळविलेला आहे. तर खासदार प्रतापराव जाधव यांनी सुमारे ५० वषार्पूर्वीच्या काँग्रेसचे खा. श्रीराम राणे यांच्या सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रमचीही बरोबरी साधली आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडात बुलडाणा जिल्'ात शिवसेनेची मोठी ताकद पाहता आ. डॉ. रायमुलकर यांचा समावेश होणे संघटनात्मक पातळीवर क्रमप्राप्त वाटत होते.

दोन्ही खासदार बैठकीत?

पश्चिम वºहाडातील एकाही आमदाराला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर खा. भावना गवळीही नाराज असल्याचे सांगण्यात येत असून त्यासंदर्भात त्यांना संपर्क साधला असता आपण जिल्हा परिषद निवडणुकीसंदभार्तील एका बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पश्चिम वºहाडातील शिवसेनेच्या आमदारांसह पदाधिकाºयांमध्येही तीव्र नाराजी असल्याची भावना आता कार्यकतेर्ही व्यक्त करीत आहेत. बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव यांनीही या मुद्द्यावर स्पष्टपणे न बोलता आपण बैठकीत असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही खासदारांमध्येही मंत्रीमंडळात पश्चिम वºहाडातील एकाही आमदाराला स्थान न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

पश्चिम वºहाडाला मंत्रीमंडळ विस्तरामध्ये वगळल्याच्या पार्श्वभूमीवर खा. प्रतापराव जाधव, आमदार द्वय डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत पश्चिम वºहाडातील जिल्हा शिवसेना प्रमुख व अन्य पदाधिकारी हे लवकरच मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या तीव्र नाराजीच्या भावना कळवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे पश्चिम वºहाडातून विधान सभा किंवा विधान परिषदेतून किमान एकाला संधी द्यावी, अशी मागणीही या लोकप्रतिनिधींनी शिवसेनेचे अनिल देसाई, संजय परब, खा. संजय राऊत यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीला फारसे स्थान देण्यात आले नव्हते.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना