शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ‘अंनिस’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST

बुलडाणा : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, अशा पूरग्रस्तांना ...

बुलडाणा : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, अशा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'साथी हात बढाना' असे आवाहन समितीकडून करण्यात आले असून, त्यासाठी राज्यभरातील सदस्य कामाला लागले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यात महापूरने थैमान घातले आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा संसार पाण्यात बुडाल्याचे गंभीर चित्र आहे. पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना मदतीची नितांत गरज आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटुंब दहा हजार रुपये रोख व धान्य स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत राज्याच्या सर्व पूर व आपत्तीग्रस्त भागात देण्याची घोषणा पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परंतु या मदतीची प्रतीक्षा न करता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यभरातून मदत कार्य करण्यास सुरुवात केली आहे. या मदतीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समिती सदस्य सक्रिय झाले आहे. २५ जुलैपासून राज्यभरातून मदत कार्य सुरू झाले आहे.

अशी दिली जाते मदत

पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून मदत देण्यात येत आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, नवीन कपडे, चादरी, ब्लँकेट, शाली, शैक्षणिक साहित्य, फूड पॅकेट, पाणी बॉटल, औषधे या वस्तू प्राधान्याने देण्यात येत आहेत. मदतीसाठी चांगला प्रतिसादही मिळत आहे.

मदत संकलन केंद्र

पुरग्रस्त जिल्ह्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मदत संकलन केंद्र पाच ठिकाणी आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मदत संकलन केंद्र आहे.

आपली मदत थेट गरजूंपर्यंत

महाराष्ट्र अंनिसने राज्यभरातील कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यानुसार समिती सदस्य काम करत आहेत. गेल्या तीन दिवसात मदतीचा ओघ चांगला दिसून आला. आपली मदत थेट गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

प्रशांत पोतदार, राज्य कार्य. सदस्य, सातारा

विदर्भातूनही मदतीचा ओघ हवा

महापूरलामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र अंनिसचे सर्व सदस्य काम करत आहेत. विदर्भातूनही मदतीचा ओघ वाढावा, हीच अपेक्षा.

नरेंद्र लांजेवार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती