शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेच्या तीरावरील कोलवड येथील महादेव मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:04 IST

बुलडाणा :  तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंती शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे o्रद्धास्थान आहे.  महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीला उसळते गर्दी  यात्रा महोत्सवाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंती शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे o्रद्धास्थान आहे.  महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.पैनगंगा व वरखडी नद्यांच्या संगमावर शिवशंकराचे हेमाडपंती जागृत मंदिर दगडाच्या चिर्‍यामध्ये बांधले होते, अशी माहिती मिळते. हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे कोलवड ग्रामस्थ व सागवन येथील माधवआप्पा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला होता. हेमाडपंती मंदिर असताना मंदिरातील पिंड खोलवर होती; परंतु जीर्णोद्धार करताना ग्रामस्थांच्या विचार विनिमयानंतर शंकराची पिंड वर घेण्यात आली, तर मंदिराच्या जुन्या दगडाचा उपयोग पायाभरणीमध्ये करून षटकोनी सिमेंटच्या विटात मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात आला. या मंदिराची स्थापना कोणी केली, याबाबत माहिती मिळत नसली, तरी मंदिर परिसरात मोठे पिंपळाचे जुने झाड व मंदिरासमोर दीपमाळ होती, असे वृद्ध मंडळी सांगतात. कालांतराने दीपमाळ पाडण्यात आल्याने त्याठिकाणी गणपतीची मूर्ती आढळली. यावेळी सागवनचे बसू आप्पा यांनी मोठय़ा भक्तीभावाने या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधून दिले.  वतनदार पहाडसिंग पाटील व म्हातारजी पाटील यांनी मंदिरावर जाणार्‍या रस्त्यासाठी जागा दिल्याने रस्ता तयार करण्यात आला. मंदिर परिसरातील सोयी-सुविधेमुळे काही भाविक भक्त आपल्या मुला-मुलींचे लग्न या ठिकाणी लावतात, तर महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून शिवमंदिर ट्रस्ट प्रयत्न करीत असल्याचे तेजराव पाटीलबा पाटील व रामराव बंडूजी पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा