शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

माफियाने पथकाच्या ताब्यातून अवैध रेतीचा ट्रक पळवला; तलाठ्याला मारहाण 

By सदानंद सिरसाट | Updated: March 15, 2024 19:43 IST

शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे.

खामगाव-जलंब (बुलढाणा): शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता दरम्यान तलाठ्यांच्या चौघांच्या पथकाने खामगाव-जलंब रस्त्यावर पहुरजिरा रेल्वे गेटजवळ रेतीचे अवैध वाहन पकडले. यावेळी खामगावातील कुख्यात रेतीमाफिया घटनास्थळी आला. त्याने वाहनात बसलेल्या तलाठ्याला खाली खेचून चालकाला वाहन दामटण्याचे फर्मावले. तसेच कुणी मध्ये आल्यास उडवण्याचीही धमकी दिली. त्यामुळे या परिसरात पुन्हा माफियांचा उच्छाद सुरू झाल्याचे उघड होत आहे.

शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्याचा खामगावातील माफियांचा धंदा तेजीत आहे. त्यासाठी विनाक्रमांकाच्या वाहनाचा वापर केला जातो. या वाहनांमुळे आतापर्यंत कठोरा, भास्तन, माटरगाव, जलंब, पहुरजिरा, वाडी या गावांतील अनेक नागरिकांचा बळी घेतला. तर अनेकांना हातपाय गमावण्याची वेळ आली. त्याविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार ॲड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत समस्या मांडली होती. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या शंकास्पद कार्यपद्धतीची माहितीही दिली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकाची नियुक्ती केली. त्या पथकांना नदी घाटातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पहारा देण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर फक्त काही दिवसातच माफियांचे कारनामे सुरू झाले. त्यामध्ये खामगावातील माफियांची संख्याच अधिक आहे. त्यांना प्रशासन, लोकप्रतिनिधीही आवरत नसल्याने सर्वसामान्यांचे जगणेच कठीण झाले आहे.

माफिया येताच चालकाला वाटले ‘हायसे’याप्रकरणी ताब्यात घेतलेले रेतीचे वाहन तहसीलमध्ये जमा करण्यासाठी पथकातील ठाकरे नामक तलाठी वाहनाच्या केबिनमध्ये बसले. त्यावेळी चालकाने खामगावातील प्रशांत नामक रेतीमाफियाला माहिती दिली. तो तातडीने पोहचला. त्यावेळी वाहनचालकाला ‘हायसे’ वाटले. त्याने तलाठ्याला केबिनच्या खाली खेचले. तसेच चालकाला वाहन दामटण्याचे सांगितले. कुणी आडवा आल्यास उडवून टाक, असेही बजावले. उपस्थित तलाठी सदाशिव ठाकरे, आर.एम. ऐनवार, सचिन ढोकणे, वाल्मीकी वैद्य हे हताशपणे हा प्रकार पाहत होते. याप्रकरणी मंडळ अधिकारी देशमुख यांनी रात्रीच पोलिसात तक्रार देणे आवश्यक होते. मात्र, ते या प्रकारापासून नामानिराळे राहिले.

तहसीलदार बाजड यांना दिला अहवालया घटनेचा वृत्तांत असलेला अहवाल तलाठ्यांनी शुक्रवारी दुपारी तहसीलदार दीपक बाजड यांना दिला. त्यामध्ये अज्ञात क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले असता ते अज्ञातांनीच पळवून नेल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्यांना खामगावातील तो माफिया चांगलाच परिचित आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून वाहन जमा करणे आवश्यक असताना वस्तुस्थिती तहसीलदारांपासून लपविण्याचा प्रकार घडला आहे.

पहुरजिरा परिसरातच मोठे साठेखामगावातील या माफियाने शांतपणे पहुरजिरा परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात रेती साठे केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला सोडून देण्यात आले. यावेळी तलाठ्यावर कोणाचा दबाव आला. तसेच माफियाचे काहीच वाकडे होत नसल्याने त्याची हिंमत वाढत असल्याचे काही तलाठ्यांनी सांगितले आहे. संबंधित तलाठ्यांनी घटनेचा अहवाल दिला आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी पोलिसांना पत्र दिले जाणार आहे. तसेच पोलिसांचाही कारवाईमध्ये सहभाग घेतला जाईल. - दीपक बाजड, तहसीलदार, शेगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणा