मोताळा (जि. बुलडाणा) : स्थानिक नगर पंचायतीच्या अध्यक्षपदांकरिता मंगळवारला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार बयनाबाई ङ्म्रीकृष्ण पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसच्या माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांचा नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र या बाबतची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबरला निवडणुकीच्या दिवशीच होणार आहे. मोताळा नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाकरिताची निवडणूक २६ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. याकरिता काँग्रेस अपक्ष गटातर्फे माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांनी तर भाजपातर्फे बयनाबाई ङ्म्रीकृष्ण पाटील यांनी अर्ज दाखल केले होते; मात्र काँग्रेसकडे असलेले सदस्य पाहता माधुरी देशमुख यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोताळा नगराध्यक्षपदी माधुरी देशमुख निश्चित
By admin | Updated: November 25, 2015 02:07 IST