सध्या सर्वत्र कोरोना संकट कायम आहे. या जीवघेण्या कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, लग्न समारंभ, इत्यादी कार्यक्रम हे साध्या पद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन वेळोवेळी शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याच आवाहनाला प्रतिसाद देत १२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांचा जन्मोत्सव सोहळा गावोगावी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी सर्व ठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम साजरे होत आहेत. गोहोगाव येथेसुद्धा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ जानेवारीला गावकरी मंडळाच्या वतीने सार्वजनिक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता आपापल्या घरीच कौटुंबिक स्तरावर माॅ जिजाऊ जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
माॅ जिजाऊ जयंती घरच्या घरी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST