सुलतानपूर : सुलतानपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भानापूर येथे नागपूर-मुंबई महामार्गावर लक्झरी बस आणि क्रुझरची समारोसमोर धडक होऊन एक जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिलच्या रात्री १२ वाजेदरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी नागपूर-पुणे गाडी क्र. एम.एच.०९ टीव्ही ०५३२ ही वाहनचालक तानाजी वसंत कुंभार (२५) नागपूरवरून पुणेकडे जात असताना राज्य महामार्गावरील सुलतानपूर नजीकच्या भानापूर येथे समोरून आपल्या गावी सुलतानपूरकडे आपली क्रुझर क्रमांक एम.एच.२८ ए.एन. ०५२० ने चालक राजू माणिक भानापुरे (वय ३०) हे आपल्या साथीदारसह येत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी बसची जोरदार धडक झाल्याने क्रुझरमध्ये असलेले मनोहर कुंडलीक भानापुरे (वय ३२) हे जागीच ठार झाले, तर क्रुझरचे चालक राजू माणिक भानापुरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्यामुळे संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. --