शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंट देण्याचे आमिष, 26 लाखांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

By भगवान वानखेडे | Updated: September 13, 2022 19:22 IST

इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय.

बुलढाणा: इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशनमध्ये २६ लाखाची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

जिल्ह्यातील खामगाव शहर, किनगाव राजा, बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग पॉईंट देण्याच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली होती. या फसवणुकीची रक्कम २६ लाख रुपये ऐवढी होती. याप्रकरणी सायबर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी गौरव रतनलाल शर्मा, संदीप लुलाराम, राहुल प्रसाद सुधीर प्रसाद, मानव क्रिष्णकुमार शर्मा, शेखर प्रकाशचंद शर्मा (सर्व रा.दिल्ली) या पाच जणांना अटक केली. या आरोपीकडून नगदी ७३ हजार ७८० रुपये तर बॅकेमध्ये गोठविण्यात आलेली २ लाख ६४ हजार ४९१ रुपये यासोबतच इतर साहित्य असा एकुण ५ लाख ४२ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बळीराम गिते, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, दुर्गेश राजपुत, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजु आडवे, पवन मखमले, नंदकिशोर आंधळे, राजदीप वानखडे, आनंदा हिवाळे, कैलास ठोंबरे, नीलेश चाटे, अजीस परसुवाले, उषा वाघ व चालक अविनाश मुंढे, शोहेब अहमद यांनी केली.

अशी केली जाते फसवणूकइलेक्ट्रो इव्ही पॉइंट घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेक वेबसाईट तयार करुन त्याची सोशल मीडियावर जाहिरात केली जाते. चार्जींग स्टेशन घेण्यासाठी सरकारी अनुदानाबाबत आणि चार्जिंग पॉईंट घेणाऱ्या उमेदवारास भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबत प्रलोभन दिले जातात. त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही, फक्त रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार असल्याचे सांगुन ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे त्यांची वेगवेगळ्या कारणासाठी डिस्कॉम फी, टॅक्स, जीएसटी टॅक्ससाठी बॅंकामध्ये पैसे भरण्याचे सांगतात. या प्रकारे ग्राहक जोपर्यंत पैसे भरत असतो तोपर्यंत त्यास पुन्हा पुन्हा रकमेची मागणी केल्या जाते.

टॅग्स :fraudधोकेबाजीbuldhanaबुलडाणा