शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामात हलगर्जी; ७१ शिक्षकांविरोधात गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 16:24 IST

७१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरोधात  (शिक्षक)   मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर: छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षीप्त पुनर्निरीक्षण व मतदार पडताळणी कार्यक्रमास सहकार्य न करता कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मेहकर तालुक्याील ७१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरोधात  (शिक्षक)   मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमानुसार मतदार याद्या अद्यावत करण्याच्या दृष्टीने ज्या शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अदिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांनी घरोघरी जावून हायब्रीड बीएलओ अ‍ॅपनुसार मतदार पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते देऊन तीन महिने उलटले तरी या कामास अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांना सुचना देऊनही यात सुधारणा झाली नव्हती. यासाठी संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र तरी यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या निर्देशानुसार नायब तहसिलदार पंकज मगर यांनी निवडणूक आयोगाच्या कामात हलगर्जीपणा करणाºया ७१ शिक्षकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावरून या शिक्षकांविरोधात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कामासाठी तालुक्यातील २४१ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यातील ७१ शिक्षकांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. १३ फेब्रुवारी रोजी हे काम पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. मात्र दोन फेब्रुवारीला मतदार पडताळणीच्या कामाचे अवलोकन केले असता या ७१ शिक्षकांचे काम शून्य दिसून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ नुसार व भारतीय दंड संहिता १९६० च्या कलम १८८ नुसार पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील दोन लाख १७ हजार ८८ मतदारांच्या याद्यांचे पुनर्निरीक्षण नोव्हेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान हे काम करावयाचे होते. मेहकर तालुक्याचे यासंदर्भातील काम आतापर्यंत अवघे सात टक्केच झाले आहे.

शिक्षकांनी न्यायालयात घेतली होती धावनिवडणूक आयोगाच्या कामामुळे अध्यापणाकडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच या कामाकडे दुर्लक्ष केले होते, असे म्हणत शिक्षकांनी यापूर्वी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास दाद न मिळाल्याने २०८ मतदा केंद्रस्तरीय अधिकारी (शिक्षक) यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांना या प्रकरणात स्थगिती आदेश मिळू शकला नव्हता. दरम्यान, त्यानंतर या प्रकरणात ७१ जण कारवाईस पात्र ठरले आहेत.

 निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम व पडताळणी कार्यक्मर हाती घेतला होता. त्यासाठी मेहकर तालुक्यात २४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (शिक्षक) यांची नियुक्ती करून प्रशिक्षणही दिले होते. मात्र संबंधीत शिक्षकांनी ही बाब सुचना व कारणे दाखवा नोटीस देवूनही गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे निष्क्रीय शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.(गणेश राठोड ,उपविभागीय अधिकारी ,तथा निवडणूक निर्णायक अधिकारी, मेहकर)

 मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयावर निवडणूक विभागाने कोणती कारवाई केली, याबाबत कल्पना नाही. त्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर बोलता येईल.( ज्ञानेश्वर धांडे, पालिका प्राथमिक शिक्षक संघटना, शाखा मेहकर)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक