शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पपई रोपांमुळे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:36 IST

मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांनी तायवान पपईची लागवड केली खरी; परंतु बोगस व निकृष्ट दर्जाच्या पपई रोपांमुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देआर्थिक फटका : मोमीनाबाद येथील शेतकरी त्रस्त; कृषी अधिकार्‍यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सतत चार ते पाच वर्षांपासून विविध संकटांचा सामना करीत असलेला तालुक्यातील शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. मुळातच कष्टाळू व जिद्दी असणार्‍या काही शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जास्त उत्पन्नाच्या आशेने नवीन पिके अवलंबिली आहेत. यामध्ये मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांनी तायवान पपईची लागवड केली खरी; परंतु बोगस व निकृष्ट दर्जाच्या पपई रोपांमुळे दोघांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.मोमीनाबाद येथील सचिन संजय काळे या तरूण शेतकर्‍याने शेतीला नवी दिशा देत उत्पन्नवाढीचा मार्ग म्हणून तायवान पपईची दोन हजार रोपांची लागवड केली. सचिनने मोहोळ जि. सोलापूर येथील एका रोप वाटिकेमधून २ मार्च १७ रोजी ११ रूपये प्रमाणे दोन हजार रोपे खरेदी केली व मार्च महिन्यातच दोन ते अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली. यानंतर  खते, फवारणी औषधे, मजुरी, ठिबक सिंचन असा एकूण दीड लाख रुपये खर्चही केला; परंतु झाडे मोठी होतानाच यामधील काही झाडांना फळधारणा होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोमीनाबाद येथीलच सुरेश लक्ष्मण गवळे यांनीसुद्धा याच रोपवाटिकेमधून मार्च महिन्यात ११ रुपये प्रमाणे चार हजार पपई रोपे रुपये ४४,000 रुपयाला खरेदी केली व लागवड केली.  त्यांनीही खते, फवारणी, औषधे, निंदण, ठिबक सिंचन व इतर खर्च मिळून पपई बागेसाठी जवळपास साडेतीन लाख रूपये खर्च केला; परंतु त्यांच्याही ५0 टक्के झाडांना फळधारणा झाली नसल्याने या दोघांनीही रोपवाटिका संचालकाशी तीन महिन्यांपूर्वी संपर्क साधला. चार ते पाच वेळा फोन केल्यावर रोपवाटिकेचे प्रतिनिधी हे मोमीनाबाद येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गेले; परंतु यानंतरही काही प्रतिसाद न मिळाल्याने दोनही शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍यांकडे तक्रार केली. यानंतर तालुका कृषी अधिकारी पी. ई. अनगाईत, पं.स. कृषी अधिकारी चव्हाण यांनी सदर शेतांवर जावून पाहणी केली असता, नुकसान झाल्याचे आढळले. पंचनामा करण्यात आला व त्यामध्ये ३८ टक्के झाडे वांझ असून, फळधारणाच झाली नसल्याचे व फळधारणा झालेल्या झाडांनाही कमी फळे लागल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. त्यामुळे या शेतकर्‍यांचे ५0 टक्के नुकसान झाले आहे. प्रति झाड एक क्विंटल माल निघत असताना अर्धी झाडे वांझ निघाल्याने सचिन काळे व सुरेश गवळे या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शेतकर्‍यांनी स्वत: रोपे तयार करावीतपपई किंवा अन्य फळझाडांची रोपे विकत घेताना त्यावर कोणतेही लेबल नसते. कायद्याचा आधार नसतो, कोणत्या बियाण्याचे रोप आहे, याची खात्रीही नसते. बियाण्यांची मुदत काय होती. जात, प्रकार अशी कोणतीही माहिती व खात्री रोप घेताना नसते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता पाहता शेतकर्‍यांनी स्वत: रोपे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या शेतात तयार केल्यास त्याचा त्यांना फायदा होईल.

मोठय़ा हिंमतीने पपईची लागवड केली होती. आवश्यक तो सर्व खर्चही केला; परंतु झाडेच वांझ निघाल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, ही अपेक्षा आहे.- सचिन काळे,शेतकरी मोमीनाबाद

याबाबत बोडखे रोपवाटिकेचे मालकांशी फोनवर चर्चा केली असता, त्यांनी तुमच्याच्याने जे होईल ते करा, अशा शब्दात अवहेलना केली. शेतकर्‍यांचा गैरफायदा घेतला जातो. झालेले नुकसान खूप जास्त आहे. त्यामुळे कृषी विभागाने न्याय मिळवून द्यावा.- सुरेश गवळे,शेतकरी मोमीनाबाद.