शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंढेऱ्यात पोलीस पाटलांच्या घरावर दरोडा; ८७ हजारांचा मुद्देमाल लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:37 IST

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस पाटलांच्या घरीत सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

अंढेरा:  देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस पाटलांच्या घरीत सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दरोडेखोरांनी पोलिस पाटील यांच्या घरासोबतच परिसरातील मळा शिवार, म्हसोबा मंदिरराच्या परिसरातही गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास लुटमार करण्याच्या प्रयत्न केला.दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत शकुंतला संतोष सानप, विष्णू शिवहरी कुटे, शिला विष्णू कुटे, आनंदी विठोबा सानप, सचिन तेजनकरसह अन्य काही जणांना चाकू व टामीच्या धाकावर मारहाण करून जखमी केले. दरम्यान, या घटनेमुळे अंढेरा परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अंढेरा येथील पोलिस पाटील संतोष सानप हे त्यांच्या निवासस्थानी रात्री झोपलेले असतानागुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी चाकू व टामीने त्यांच्या घराचे दार उघडून आत प्रवेश केला.सोबतच त्यांची आई आनंदीबाई सानप यांना मारहाण करून त्यांच्या हातातील चांदीच्या पाटल्या, कानातील बाळ््या, मनी पोत असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सानप यांचे जावाई व मुलगीही योगायोगाने आलेले होते. त्यांनाही या दरोडेखोरांनी मारहाण केली.सानप यांच्या घरातील व्यक्तींच्या अंगावर असलेले सोन्या-चांदीचे दागिने लुटल्यानंतर या दरोडेखोरांनी पॉवर हाऊस नजीक असलेल्या मळा शिवारात धुमाकुळ घातला. सचिन आनंद तेजनकर यांच्यासोबतच दरोडखोराची झटापट झाली.त्यात दरोडेखोराने सचिन यांच्या तोंडावर टामी मारल्याने ते जखमी झाले. या भागातील तीन ते चार घरांना दरोडेखोरांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या होता. याच दरम्यान चोरट्यांनी शेळके शिवारातील म्हसोबा मंदिराच्या परिसरातील एका गोठ्याचेही कुलूप तोडले. मात्र तेथून काही चोरी केली नाही.त्यानंतर दरोडेखोरांनी विजय हिंम्मतराव तेजनकर यांच्या गोठ्यावर काम करणाऱ्या शशिकला प्रल्हाद डोंगरे यांच्या गळ््यातील डोरले व ३० मनी असा सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोरांजवळ एक मोठी गाडीही होती, अशी चर्चा आता गावात आहे. मात्र पोलिसांकडून त्यास पुष्टी मिळू शकली नाही.या घटनेची माहिती जवळच सानप यांनी ठाणेदार कारेगावकर यांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक पहाटे त्यांच्या घरी पोहोचले. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी नलावडे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञांचे पथक तथा श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या पथकाने चोरीचा उलगडा व्हावा, या दृष्टीकोणातून घटनास्थळी पाहणी करून आवश्यक माहिती गोळा केली. दरम्यान, दरोडेखोरांनी पलायन करताना टामी व अन्य काही साहित्य रस्त्यात टाकून दिले.दरोडेखोरांकडून लेझरचा वापर?या दरोड्यामध्ये सहभागी असेलल्यांनी दरोड्यानंतर पळतांना लेझरचा वापर केल्याची चर्चा परिसरात आहे. अंधाराचा फायदा घेत पलायन केल्यानंतर आपले साथीदार सोबत आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी ते लेझरचा वापर करीत होते, असे सांगितल्या जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा