शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

ग्राम परिवर्तनाच्या अभ्यासासाठी ‘लंडन’चा पाहुणा जांभळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:09 IST

धामणगाव बढे : भारतीय खेडी, ग्रामीण जीवन तथा त्या भागातील विकासाची प्रक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी २३ वर्षीय ईवॉन फ्रेंच औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गावात पोहोचला असून, तेथे ग्राम परिवर्तनाचा दूत बनलेल्या सद्दाम खानसोबत १५ दिवस राहून ग्राम परिवर्तनाचा अभ्यास करणार आहे.

ठळक मुद्देऑक्सफर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी ईवॉन फ्रेंच सद्दामच्या भेटीला

नवीन मोदे । लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : भारतीय खेडी, ग्रामीण जीवन तथा त्या भागातील विकासाची प्रक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी २३ वर्षीय ईवॉन फ्रेंच औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गावात पोहोचला असून, तेथे ग्राम परिवर्तनाचा दूत बनलेल्या सद्दाम खानसोबत १५ दिवस राहून ग्राम परिवर्तनाचा अभ्यास करणार आहे.लंडन येथे राहणार्‍या ईवॉनने नुकतीच ऑक्सफर्ड विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. भारतातील ग्रामीण जीवन अनुभवण्याच्या उद्देशाने तो भारतात आला. ग्रामीण भागात विकासाची प्रक्रिया महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन मिशनकडे संपर्क साधला. संबंधित विभागाने ईवॉन फ्रेंच यास सद्दाम खान काम करीत असलेल्या जांभळी गावात पाठविले. २८ जानेवारी रोजी ईवॉन फ्रेंच जांभळी गावात दाखल झाला. त्यामुळे सतत १५ दिवस तो सद्दाम खानसोबत राहून ग्राम परिवर्तनाचे निरीक्षण करणार आहे. त्यासाठी तो सद्दामसोबतच राहत असून, गावकरी सद्दामला मेस लावू देत नाहीत, त्यासोबतच ईवॉन फ्रेंचसुद्धा जांभळीवासियांच्या घरी जेवण करीत आहे. धामणगाव बढे येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने अतिशय दुर्गम व विकासापासून दूर असलेल्या जांभळी या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या चार गावात चांगले काम केले. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्‍वेता शालिनी यांनी जांभळी गावाला भेट दिली तर राज्याचे अपर सचिव प्रवीणसिंग परदेशी, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त संचालक उमाकांत दांगड या अभियानात मार्गदर्शन करीत आहेत.

लोकमतच्या वृत्तामुळे सद्दाम बनला स्टार समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानाची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी विविध घटकांची मदत घेतली. त्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, अमिताभ बच्चन यांसह उद्योग जगत पुढे आले. त्यासाठी प्रशासनातील मोठे अधिकारी परिo्रम घेत आहेत. या अंतर्गत धामणगाव बढे येथील युवक सद्दाम खान याने जांभळी गावात आपल्या कामाचा ठसा उमटविला. सद्दामची परिस्थिती तशी जेमतेम. वडील बसचालक होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. दोघे भाऊ बसचालक आहेत. सद्दामच्या कामगिरीची व अभियानाच्या यशाची बातमी २६ जानेवारी रोजी लोकमतने महाराष्ट्रात प्रसिद्ध केली आणि सद्दाम ‘स्टार’ बनला. दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रातून मोबाइल खणखणत असल्याचे सद्दामने सांगितले. अनेकांनी आम्ही काही मदत करू शकतो का, याची विचारणा केली तर लोकमतची बातमी वाचून मोबाइलवर बोलताना आनंदाने अम्मीचे अo्रु थांबत नव्हते, ही गोष्ट माझ्या परिo्रमाला बळ देणारी असल्याचे सद्दामने सांगितले.

ग्राम परिवर्तनाची वाटचाल प्रेरणादायी आहे. येथील लोक खुप चांगले आहे. तर सद्दाम येथे खुप लोकप्रिय आहे. -ईवॉन फ्रेंच, लंडन

टॅग्स :buldhanaबुलडाणा