शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 00:47 IST

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे.

लोणार : जिल्ह्याचे नव्हे, तर जागतिक वैभव असलेल्या लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला नोव्हेंबर २०२० मध्ये प्राप्त झालेला ‘रामसर’ दर्जा धोक्यात आला आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर फेरमूल्यांकन करण्यासाठी आलेल्या चेन्नई येथील पाच संशोधकांच्या पथकाच्या प्रमुख डॉ. काकोली बॅनर्जी यांनी हा संकेत दिला आहे. या युनिक वेटलॅण्डची दुरवस्था पाहून त्यांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला. नबीच्या नाल्यातून सरोवरात जाणारे सांडपाणी प्रामुख्याने यास जबाबदार असल्याचे मत संशोधकांचे आहे.

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. निरीनेच त्याची निर्मिती केली होती. नागपूर खंडपीठामध्येही दाखल एका प्रकरणात वारंवार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरीही त्याचे काय आम्हाला, अशी मानसिकता बनली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम करताना निरीने भविष्यातील लोणार शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार न करताच कमी क्षमतेच्या या प्रकल्पाचे बांधकाम केल्याचा सूर आहे. शहराची आज ४० हजार लोकसंख्या झाली आहे. लोणार शहरात होणाऱ्या पाण्याच्या वापरापैकी ६५ टक्के सांडपाणी नबीच्या नाल्याद्वारे पूर्वीही आणि आताही जात आहे.

या नाल्यावरील सांडपाणी विशिष्ट वनस्पतीच्या मुळाच्या साहाय्याने १४ टँकमध्ये जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतरत्र पंपाद्वारे उपसा करण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे काही येथे होत नाही. उभारण्यात आलेला प्रकल्प कुचकामी असून पाऊस पडल्यानंतर येथील पाणी अेाव्हर फ्लो होऊन घाणीसह हे सांडपाणी सरोवरात जातच आहे.

जैवविविधतेवर विपरीत परिणाम -सरोवरात जाणाऱ्या या सांडपाण्यामुळे विवरातील दुर्मीळ जैविक संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सोबतच सरोवराच्या पाण्याचा पीएचमध्येही फरक पडत आहे. दरम्यान, हा प्रकल्प अद्यापही निरीच्या ताब्यात आहे की पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे, याबाबत संभ्रम आहे. जबरदस्तीने तो पालिकेकडे दिला गेल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. या प्रकल्पावर देखभाल-दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च झाला असून प्रकल्पातील पाणी उपसा करून नेमके कोठे सोडण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

नबीच्या नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नियमीत मोठ्या प्रमाणावर घाण सरोवरात जात आहे. त्यामुळे या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्थेवर आघात हो असल्याचे प्राथमिक स्तरावरील पहाणीत आढळून आले आहे. या रामसर वेटलॅन्ड साईटचे संवर्धन गरजेचे आहे.डॉ. काकोली बॅनर्जी, संशोधक, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल मॅनेटमेंट (चेन्नई) 

टॅग्स :buldhanaबुलडाणा