लोणार(जि. बुलडाणा), दि. ८- नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी १0 ऑक्टोबरला होणार्या निवडणुकीत शांतीलाल गुगलीया यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने, नगराध्यक्षपदी काँग्रेसचे भूषण विश्वनाथ मापारी यांची वर्णी लागणार आहे. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रंजना राजेश मापारी यांचा कार्यकाळ संपत असून, नवीन नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. न. प. मध्ये १४ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता गट नेते शांतीलाल गुगलीया यांनी उमेदवारी दाखल केली होती. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर व इंटकचे लक्ष्मणराव घुमरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शांतीलाल गुगलीया यांनी उमेदवारी मागे घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष खानासेठ, कांता पाटील, नगराध्यक्षपती राजेश मापारी, पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
लोणार येथे मापारी यांची लागणार वर्णी!
By admin | Updated: October 8, 2016 01:47 IST