शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर : इजेक्टा ब्लँकेटच्या जतनाला दरसूचीचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:35 IST

Lonar Sarovar: शासनस्तरावर पाठविण्यात आलेला यापूर्वीचा प्रस्ताव आता नव्याने पाठवावा लागणार असल्याचे संकेत बुलडाणा पाटबंधारे मंडळातील सूत्रांनी दिले.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आग्नेय दिशेकडून आलेल्या अग्नीचा आघात होऊन निर्माण झालेल्या लोणार सरोवर परिसरात लाखो वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेत उडालेला मलबा  (इजेक्टा ब्लँकेट) देऊळगाव कुंडपाळ येथील काळापाणी प्रकल्पाच्या सांडव्याच्या परिसरात सुरक्षित असून, त्याच्या जतनासाठी तेथे उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाला दरसूचीचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनस्तरावर पाठविण्यात आलेला यापूर्वीचा प्रस्ताव आता नव्याने पाठवावा लागणार असल्याचे संकेत बुलडाणा पाटबंधारे मंडळातील सूत्रांनी दिले.विशेष म्हणजे नागपूर खंडपीठाने याच्या जतनासाठी १० ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या एका संयुक्त बैठकीत आदेश दिले होते.२०१८-१९च्या दरसूचीनुसार या कामासाठी एक कोटी ६१ लाख १४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र स्टीलचे व अन्य वस्तूंचे भाव वाढल्यामुळे यापूर्वी पाठविण्यात आलेला कामाचा प्रस्ताव शासनस्तरावरून परत आला आहे.  आता नव्या दरसूचीनुसार हे काम करावे लागणार आहे. त्यातल्या त्यात निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मुळातच हे काम रखडलेले होते. त्यामुळे नव्या दरसूचीनुसार या कामासाठी एक कोटी ७१ लाख ३१ हजार रुपये खर्च आहे. हा खर्च पर्यटन विभागांतर्गत करायचा की अन्य दुसऱ्या हेडमधून करायचा याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

६४० मीटर लांबीच्या भिंतीअग्नीच्या आघातानंतर उडालेला मलबा किंवा लाखो वर्षांपूर्वीचा मातीचा थर व अन्य मलबा  हा देऊळगाव कुंडपाळ येथील काळापाणी प्रकल्पाच्या सांडव्यात सुरक्षित आहे. पण दरवर्षी सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे तो वाहून जातो. त्यामुळे त्याच्या जतनासाठी नागपूर खंडपीठाने २०१९ मध्येच आदेश दिले होते. याची पाहणी कर्नाटक विद्यापीठातील जिओलॉजिकल विभागाचे तज्ज्ञ डाॅ. एम. लिंग देवरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून त्याची पुष्टी केली होती. त्यामुळे हा थर संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रकल्पाच्या सांडव्याच्या परिसरात त्यासाठी चार वेगवेगळ्या स्तरावर संरक्षक भिंती उभाराव्या लागणार असून, ४३५ मीटर, ७५ मीटर, ६० मीटर आणि ७० मीटरच्या त्या राहतील.  यासंदर्भातील प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून शासनास नव्याने सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा