शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

लोणार : ‘मानव विकास’च्या १५ लाखांच्या निधीचे नियमबाह्य़ वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:59 IST

लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रायगाव  प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पूर्वाश्रमीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी ही नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रायगाव  प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पूर्वाश्रमीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी ही नोटीस बजावली आहे.लोणार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. बी. आर. राठोड  २0१३ ते २0१५ या कालावधीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत या निधी वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या गोदावरी भगवान कोकाटे यांनी नऊ जानेवारी २0१८ रोजी केली होती. त्यावेळी २0१३-१४ या कालावधीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मानव विकास कार्यक्रमाकरीता पाच लाख २३ हजार ५00 रुपये आणि २0१४-१५ मध्ये दहा लाख ४९ हजार असे १५ लाख ७२ हजार रुपये अनुदान रायगाव प्राथमिक आरोग्य केंदासाठी वितरीत केले होते. त्यासंदर्भाने रोख पुस्तक तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक लेखा अधिकारी हे गेले असता उपरोक्त कालावधीचे रोख पुस्तकच आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले नव्हते. सोबतच खर्चाची प्रमाणके सुद्धा तपासणीसाठी उपल्बध करून देण्यात आली नव्हती. त्याबाबत डॉ. राठोड यांनी दोन दिवसात ते उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. परंतू ती उपल्बध करून दिली नाही. त्यामुळे डॉ. राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वेळेत ती उपलब्ध करून दिली नाही तर संबंधीत रक्कम ही डॉ. राठोड याच्याकडून वसूल करण्याची कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा