शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोणार : रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाच; वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:18 IST

लोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या  कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र  लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून  आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला तरी  अंमलबजावणी मात्र कुठेच दिसून येत नाही.

ठळक मुद्देजनजागृतीवर भर, अंमलबजावणी मात्र शून्य!

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या  कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र  लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून  आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला तरी  अंमलबजावणी मात्र कुठेच दिसून येत नाही.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी वाहतूक शाखेकडून  वाहनांवर कारवाई होत असतानाही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवले  जात आहेत. सुरक्षा सप्ताह सुरू असताना तरी वाहतुकीला शिस्त लागेल,  अशी अपेक्षा असताना तसे होताना दिसून येत नाही. दुचाकी, चारचाकी  वाहने बेदरकारपणे चालवणे, कर्कश हॉर्न वाजविणे, धावत्या दुचाकीवर  मोबाइलवर बोलणार्‍याची संख्या कमी नाही. तसेच शालेय विद्यार्थी आणि  प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षांमध्ये कोंबाकोंबी सुरूच आहे. अवैध प्रवासी  वाहतूक, परवाना न हाताळणे, इंग्रजी, मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या  काचा वापरणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणार्‍यांवर  कारवाई करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले असले  तरी मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई करूनदेखील वाहतूक नियमांचे सर्रास  उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात वाहने पार्किंगसाठी  व्यवस्था नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला नियमबाह्य उभी राहत  असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत.  वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा  सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते; परंतु वाहनचालक याकडे  दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. हेल्मेटविषयी मोटार  सायकलस्वारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उदासीनता असल्याचे निदर्शनास आले.

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी!लोणार शहरातील प्रत्येक चौकात व मेहकर-लोणार मार्गावर चालणार्‍या  प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले दिसून येत आहेत.   अनेक ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या काळातच वाहतूक नियमाकडे  दुर्लक्ष करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र अल्पवयीन मुलेही दुचाकी  चालविताना आढळून येत आहेत. एका दुचाकीवर तीन ते चार जण व विना परवाना सुसाट सुटत अनेक अल्पवयीन मुले, मुली दुचाकी वाहने चालवि ताना सकाळ-संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. ग्रामीण भागात  जाणार्‍या ऑटोसह काळी पिवळी वाहनांमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी  नेले जात असल्यामुळे काही ठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात होत  आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली  असून, दंड वसूल करण्यात आला आहे. सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून  जनजागृती करण्यात येत आहे.- डी.एम. राठोड, वाहतूक शाखा, लोणार.

टॅग्स :Lonarलोणारroad safetyरस्ते सुरक्षा