शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर संवर्धनाचा केवळ सोपस्कारच; ‘इजिक्टा ब्लँकेट’चाही प्रश्न प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:28 IST

लोणार : सरोवर संवर्धनाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने फारसे गंभीरतेने पावले उचलल्या गेलेली नाहीत. त्यामुळे सरोवर संवर्धन आणि अ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देविकास आराखडा अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सरोवर संवर्धनाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने फारसे गंभीरतेने पावले उचलल्या गेलेली नाहीत. त्यामुळे सरोवर संवर्धन आणि अ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, २0१0 मध्ये लोणार सरोवर विकासासाठी दहा कोटी रुपये मिळाले होते; परंतु दुर्लभ वनस्पती, सरोवर संवर्धन, पौराणिक स्थळांच्या संवर्धनाला त्यामध्ये प्राधान्य दिल्या गेले नाही. वरकरणीच कामे झाल्याची ओरड लोणारातील नागरिक करीत आहेत.दुसरीकडे नागपूर खंडपीठात दाखल प्रकरणानंतर २0१५ च्या जानेवारी महिन्यात प्राप्त आदेशानुसार गठीत समितीची नऊवी सभा २३ ऑगस्ट रोजी लोणार येथील एमटीडीसीच्या पर्यटन संकुलात घेण्यात आली. जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. खंडपीठाच्या निर्देशानुसार आठव्या बैठकीतील मुद्दे यात चर्चिल्या गेले. संबंधित शासकीय व अशासकीय सदस्य या बैठकीस उपस्थित होते.सरोवरातील पिसाळ बाभूळ काढण्याचा मुद्दाही त्यावेळी ऐरणीवर आला होता. ऑक्टोबर २0१७ मध्ये त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. जैवविविधतेची साखळी आणि पक्षी अभयारण्याला धोका होणार नाही, याची काळजी घेऊन हे काम कटाक्षाने केले जाणार होते. त्या दृष्टीने हालचाली झालेल्या नाहीत. इजिक्टा ब्लँकेटचाही मुद्दा बैठकीत चर्चिल्या गेल्याप्रमाणे निकाली निघाला नाही. तांत्रिक मुद्दा असल्याने डॉ. नाथानी बसवैय्या  आणि डॉ. लिंगदेवराय कलबुर्गी यांच्याशी संपर्क करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्या दृष्टीने कुठलीच हालचाल अद्याप झालेली नाही. सरोवर संवर्धनाबाबत आतापर्यंत १00 बैठका झाल्या असतील परंतु ठोस असा निष्कर्ष अद्यापही निघालेला नसल्याचे चित्र आहे.सरोवर काठावर केलेल्या फेन्सींगवर लाखो रुपयांचा खर्च दाखवल्या गेला आहे; मात्र अपेक्षीत असे काम झालेले नाही. त्यातच गेल्या सहा महिन्यात सरोवर काठावर प्रवेशद्वार बांधण्यात आले. निकृष्ट बांधकाम झालेल्या प्रवेशद्वारांची दयनीय अवस्था असून, केवळ टक्केवारीसाठीच ही कामे झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धारतीर्थ ते पर्यटन संकुल मार्गावर बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचा ठीक असून गुरांचाही मुक्त संचार आहे. त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. 

टक्केवारीला प्राधान्य ?लोणार सरोवर विकासासाठी २0१0 मध्ये दहा कोटी रुपये प्राप्त झाली होती. त्यामधून सरोवरातील  दुर्लभ वनस्पती ,  प्राणी, पक्षी, ऐतिहासिक वास्तू, मंदिर , वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने महत्त्व असलेली स्थळे जतन व संवर्धन करण्याच्या कामास प्राधान्य दिले गेले नसल्याची ओरड आहे. केवळ टक्केवारीसाठीच कामे झालीत की काय? अशी चर्चा असून, सरोवर संवर्धनाला प्राधान्य देण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. वन विभागानेही यामध्ये गांभिर्यपूर्वक लक्ष घालण्याची गरज आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवर