शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर संवर्धन; आता सात जुलै रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:31 IST

नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देनिरीला हवी दोन आठवड्यांची मुदतखंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करणार.

बुलडाणा: लोणार सरोवर विकास व संवर्धनासंदर्भात नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे. याच सुनावनी दरम्यान सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याच्या संदर्भातील गुपीत समोर येण्याची शक्यता आहे. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (निरी) आणखी दोन आठवड्यांचा संशोधनासाठी अवधी हवा आहे. अ‍ॅडव्हान्स पद्धतीने सरोवरातील पाण्याच्या रंग बदलाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी संस्थेला हा अवधी हवा असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पुण्यातील आगरकर संस्थाही रंग बदलाच्या कारणांच्या निकट पोहोचली असल्याचे सुत्रांनी सांगितले.लोणार सरोवरातील पाण्याचा रंग नऊ जून रोजी गुलाबी झाला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्यासह देशात हा विषय कुतूहल व जिज्ञासा वाढविणारा ठरला होता. त्यातच नागपूर खंडपीठात लोणार सरोवर विकास व संवर्धनाच्या अनुषंगाने दाखल याचिकेवर याच कालावधीदरम्यान सुनावनी होवून पाण्याचा रंग बदलण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने नागपूर येथील निरीच्या तीन सदस्यीय पथकाने १४ जून रोजी सरोवराच्या पाण्यात उतरून सहा ठिकाणचे नमूने गोळा केले होते. पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेनेही पाण्याच्या रंग बदलासंदर्भात संशोधन सुरू केले होते. निरी संस्थेने सरोवरातील पाण्याप्रमाणे कल्चर डेव्हलप करत बारकाईने त्याचा अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे या संस्थेला आणखी दोन आठवड्यांचा अवधी प्रत्यक्ष निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाटी हवा आहे. त्यादृष्टीने निरी नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दुसरीकडे पुणे येथील आगरकर संशोधन संस्थाही प्रत्यक्ष निष्कर्षाजवळ आली असल्याची माहिती आहे. प्रसंगी एका आठवड्यात तेही याचे नेमके कारण स्पष्ट करू शकतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवर