शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीने राकाँ चिंतीत

By admin | Updated: June 15, 2014 00:46 IST

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने शिवसेना कंबर कसून कामाला लागली आहे.

सिंदखेडराजा: सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत राकॉंची शिवसेनेशी सरळ लढत होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने शिवसेना कंबर कसून कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे राकॉंत थोडेसे चिंतेचे वातावरण असले तरी, या बालेकिल्ल्यावर आपला झेंडा फडकवत ठेवण्यासाठी तो पक्ष जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र दिसत आहे.

सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी याच मतदारसंघात असल्याने, त्यांच्या कार्याचे पोवाडे आजही प्रत्येक गावात गुंजतात. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्ह्णून रिंगणात उडी घेऊन, विजय मिळविला आणि शिंगणे घराण्याचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला. पुढे डॉ. शिंगणे यांनी शिवसेनेचे सहयोगी सभासदत्व मिळविले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजतागायत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात काँग्रेस नेहमीच आक्रमक भूमिका घेत असते. ती भूमिका निवडणूक जाहीर होईपर्यंत कायम राहते. निवडणूक आखाड्यात डॉ. शिंगणे यांच्यासोबत जाण्याचे आदेश येवून धडकताच, पेल्यातील वादळ पेल्यातच शमते. आजवरच्या निवडणुकांमध्ये असाच अनुभव आला आहे.

मतदारसंघाची अदलाबदल व्हावी आणि यावेळी काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा यासाठी देवानंद कायंदे, अभय चव्हाण ही काँग्रेसची मंडळी देव पाण्यात ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या मुद्यावर ठाम असून, उमेदवारी पुन्हा डॉ.राजेंद्र शिंगणे यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी नकार दिला तरच तोताराम कायंदे किंवा रेखाताई खेडेकर यांचा विचार केला जाऊ शकतो; मात्र सध्या तरी डॉ.शिंगणे हेच उमेदवार राहतील, अशी चिन्हं दिसत आहेत. अभय चव्हाण यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेवटी काँग्रेस असा वतरुळाकृती प्रवास झाला आहे. त्यांनी एकदा विधानसभा निवडणूक लढविली होती. आता पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी ते इच्छुक आहेत. जागा काँग्रेसला सुटल्यास सौ. नंदाताई कायंदे यासुद्धा रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात पक्षाने सपाटून मार खाल्ला. तब्बल ३0 हजाराचे मताधिक्य सेनेला मिळाल्याने, प्रत्येकाच्या मनात धडकी भरली आहे; मात्र आजवर प्रत्येक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अनुकूल राहिलेला हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत मात्र प्रतिकूल झाल्याचा इतिहास आहे. वसंतराव मगर, विठ्ठलराव मोरे, छगनराव मेहेत्रे, डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शिवसेनेतर्फे टक्कर दिली; पण विजयश्रीने प्रत्येक वेळी हुलकावणीच दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीतील विजय पाहून, विधानसभा निवडणुकीतही जोर लावण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. शशिकांत खेडेकर हे तिसर्‍यांदा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. छगनराव मेहेत्रे, रविंद्र पाटील, दिलीप वाघ, दादाराव खर्डे हेदेखील इच्छूक आहेत; परंतु उमेदवारीबाबत शिवसेनेचे पत्ते सध्या तरी गुलदस्त्यातच आहेत. महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे विनोद वाघ लोकसभा निवडणुकीनंतर ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णचा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. मनसेचे रेल्वे इंजिन किती डब्बे जोडण्यात यशस्वी होते, यावरच त्यांचे गणित अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघावरही जातीय समिकरणांचाच प्रभाव असल्यामुळे, कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणत्या समाजाच्या उमेदवाराला मिळते, यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.