शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात तरुणाईची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:48 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची असून २० ते २९ वयोगटातील तीन लाख ६२ हजार आणि ३० ते ३९ वयोगटातील चार लाख १८ हजार ६५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदार संघात असून राजकीय दृष्ट्या उपरोक्त वयोगट सक्रीय असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये या वयोगाटीतील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची प्रसंगी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची असून २० ते २९ वयोगटातील तीन लाख ६२ हजार आणि ३० ते ३९ वयोगटातील चार लाख १८ हजार ६५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदार संघात असून राजकीय दृष्ट्या उपरोक्त वयोगट सक्रीय असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये या वयोगाटीतील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची प्रसंगी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात शेती, सिंचन, पाणीप्रश्नासोबतच बेरोजगारीचाही प्रश्न आहे. त्यामुळे उपरोक्त वयोगाटातील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एकंदरीत वयोगटाचा विचार करता ५० वर्षाच्या आतील मतदारांची संख्या ६८ टक्के अर्थात ११ लाख ७८ हजार ३०६ मतदार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने हा वर्ग मतदान प्रक्रियेत कोणती भूमिका बजावतो यावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.मध्यंतरी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार बुलडाणा जिल्ह्यात १७ लाख ४५ हजार ८३४ मतदार आहेत. यामध्ये आठ तृतियपंथीयांचाही समावेश आहे. दरम्यान, महिला मतदारांची संख्या ही आठ लाख ३० हजार २७५ असून पुरुष मतदारांची संख्या नऊ लाख १५ हजार ५४३ आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख ९१ हजार ७७६ मतदार होते. त्या तुलनेत २०१९ मध्ये एक लाख ५४ हजार ५८ मतदार जिल्हयात वाढले असून हे नवमतदार ही निवडणुकीचा रंग बदलवण्याची क्षमता ठेवून आहेत. दम्यान जवळपास आठ वयोगटातील मतदारांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ््या अपेक्षा आहेत.त्यावर उमेदवार कितपत खरे उतरतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे उमेदवार या मतदारांना कितपत आपलेसे करतात हा उत्सूकतेचा विषय ठरणार असून तरुणाई कोणाचे पारड्यात कौल देते हे उत्सूकतेचे ठरले आहे.३४ हजार मतदार करणार प्रथमच मतदानलोकसभा निवडणुकीमध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघाचा विचार करता ३४ हजार ३६८ नव मतदार असून असून प्रथमच मतदान करणार आहेत. यामध्ये २२ हजार १४६ पुरुष तर १२ हजार २२२ युवतींचा समावेश असून १८ ते १९ वयोगटातील हे नवमतदार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलढाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक