शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019 : तीर्थक्षेत्र विकासाच्या आश्वासनांचा दुष्काळात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 13:23 IST

लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.

- ब्रम्हानंद जाधव  बुलडाणा: जिल्ह्याला तीर्थक्षेत्रांचे वैभव लाभलेले आहे. अनेक हेमाडपंती शिव मंदिराचा मौल्यवान वारसाही जिल्ह्यात पाहावयास मिळतो. परंतू तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील भक्तांच्या भावनेशी जोडलेल्या गेलेली तीर्थक्षेत्रे सोयीसुविधांनी युक्त असावी, यासाठी अनेक दिवसांपासून भक्तांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. तर काही ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील काही तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जवळपास प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरुन केली जावू शकतात. तीर्थक्षेत्र परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, भक्तनिवास व अन्य सुविधांच्या संदर्भात विकासकामे मंजूर आहेत. तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही कामांना मुहूर्त का मिळत नाही, असा सवालही भक्तवर्गांमधून होत आहे.तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या यात्रा, उत्सवामध्ये राजकिय लोकांना प्राधान्य दिल्या जाते. त्यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करणे, त्यांचे भाषण ठेवली जातात. त्यामुळे यासारख्या धाार्मिक कार्यक्रमातूनही लोकप्रतिनिधी राजकारणाची पोळी भाजून घेतात. तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचे आश्वासन दिल्यानंतर परत तो लोकप्रतिनिधी त्या तीर्थक्षेत्राकडे वर्षभर फिरकूनही पाहत नाही. मध्यंतरी ज्या तीर्थक्षेत्रासाठी विकास निधी मंजूर झाला होता, तो कामासाठी वळती करण्यात जीएसटीचा खोडा निर्माण झाला होता. तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची गरज भक्तांमधून व्यक्त होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यामधून पंढरपूर, पैठण, आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांची भरपूर संख्या आहे. मात्र या वारकरी भाविकांना मिळणाºया सोयीसुविधा खूपच अल्प प्रमाणात आहेत. वाटचालीच्या मार्गातल्या रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झालेली आहे. या सर्व समस्या सोडविणे आवश्यक आहे.- गोपाल महाराज पितळे, सदस्यराज्य कार्यकारीणी, वारकरी महामंडळ

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र हे भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. परंतू या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवरून कामे होणे आवश्यक आहे. पंढरपूर, आळंदी येथे जाणाºया वारकºयांची संख्या लक्षात घेता वारकºयांच्या दृष्टीनेही शासनाकडून प्रयत्न करण्यात यावे.- लक्ष्मण महाराज देशमुख,आळंदीकर (घटनांद्रा, ता. मेहकर).

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणा