शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: दहा हजारावरील रक्कम द्यावी लागणार धनादेशाद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:08 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना द्याव्या लागणार्या शपथपत्रामध्ये उमेदवारावरा विरोधातील प्रलंबीतखटले, सिद्धदोषी खटले असल्यास त्याची माहितीही द्यावी लागणार आहे.विशेष म्हणजे दृकश्राव्य माध्यमासोबतच जादा खपाच्या मुद्रीत माध्यमातही त्याबाबतचे घोषणापत्र उमेदवाराला द्यावे लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिनांकापासून ते मतदानाच्या दिवशीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत ती देणे अनिवार्य राहणार आहे. दरम्याान, उमेदवार हा राजकीय पक्षाचा असल्यास त्याबाबतची प्रसिद्धी ही संबंधित पक्षाने विधीत वेळेत देणे अनिवार्य करण्यात आले आहे.दुसरीकडे निवडणूक रिंगणातील उमेदवारास त्याने बँके उघडलेल्या स्वतंत्र खात्यातूनच निवडणुकीशी संबंधीत खर्च करणे अनिवार्य आहे. दहा हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहारच फक्त त्यांना रोखीने करता येणार असून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार हे धनादेशाद्वारे किंवा आरटीजीएस, ए़नईएफटी द्वारे करणे अनिवार्य असून दररोजच खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. सोबतच निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत खर्चाच्या अंतिम विवरणाची सत्यप्रतही जिल्हानिवडणूक अधिकार्यांकडे त्यांना सादर करावी लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक