शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत आमदारांची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:35 IST

जिल्ह्यातील आगामी काळातील राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्याने २०१९ च्या या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे.

- नीलेश जोशी  बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा पूर्वार्ध २९ मार्च रोजी संपुष्टात आला असून, उत्तरार्धातील प्रचार सभांचा धुराडा आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दृष्टीने मतदारांच्या मनावर गारुड करण्याची तयारी बुलडाणा लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी चालवली आहे. असे असले तरी १७ व्या लोकसभेची निवडणूक ही लोकसभा मतदार संघातील युतीच्या चार आणि काँग्रेसच्या दोन आमदारांसाठी चांगलीच परीक्षा पाहणारी ठरणार आहे. त्यातच जिल्ह्यातील आगामी काळातील राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्याने २०१९ च्या या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे.युतीच्या आमदारांच्या कार्याचे प्रसंगी शीर्षस्थ नेतृत्त्व लोकसभेच्या निकालानंतर मूल्यमापन करणार असतानाच आघाडीच्या दृष्टीने जमेची बाजू असलेले काँग्रेसचे दोन्ही आमदारही विधानसभेच्या दृष्टीने आपले अस्तित्व पुढील काळात अधिक मजबूत करण्यासाठी लोकसभेच्या मैदानात बारकाईने लक्ष घालून आहेत. युतीच्या धर्मात छुपी आघाडी, अशा वावड्या सध्या उठत असल्या तरी युतीतील शीर्षस्थ नेत्यांचेही जिल्ह्यातील राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष आहे. असे असले तरी प्रत्यक्षात अवघ्या पाच महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उभय पक्षाच्या आमदारांना विधानसभेच्या दृष्टीने एक प्रकारे रंगीत तालिम करण्याची संधीही या माध्यमातून मिळालेली आहे. त्यामुळे आपला परफॉर्मन्स मेरिटमध्येच राहील, याची काळजीही लोकसभा निवडणुकीत उभय बाजूंच्या आमदारांना घ्यावी लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोकसभा मतदार संघाचा विचार करता भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन असे युतीचे एकूण चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. बुलडाण्यात युतीविरुद्ध आघाडी अशी थेट लढत होत आहे.२०१९ ची बुलडाण्यातील आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यातील लढत ही जिल्ह्याचे पुढील १५ ते २० वर्षाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी राहणार आहे. किंबहुना या दोघांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. २०१९ ची ही निवडणूक दोघांचा जिल्ह्यातील राजकारणावर कितपत प्रभाव आहे आणि भविष्यात तो अधिक व्यापक कसा करतात याचे गणित सोडविणारी ही लढत असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या तुल्यबळ लढतीत प्रत्यक्ष कोण बाजी मारतो, हे लोकसभा निवडणुकीच्या उत्तरार्धात स्पष्ट होणार असले तरी विद्यमान आमदारांसाठी ही निवडणूक एक परीक्षा म्हणून समोर येत आहे.

मताधिक्याचा मुद्दा चर्चेतलोकसभा निवडणुकीत कोणाचा जय-परायज होतो, यापेक्षा आपल्या विधानसभा क्षेत्रात कोणाला मताधिक्य मिळते, याचीच चर्चा अधिक आहे. प्रामुख्याने खामगाव, मेहकर, सिंदखेड राजा, जळगाव जामोद या चार मतदार संघात कोणाला मताधिक्य मिळते, यावर चर्चा होत आहे. सेनेच्या दृष्टीने बुलडाणा विधानसभा ही तितकीच महत्त्वाची आहे. येथील सेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना अमरावतीचे सहसंपर्क प्रमुख पद दिल्याने ते कधी अमरावती तर कधी बुलडाणा असे राहणार आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी त्यांच्या विरोधकांनाही योग्य पद्धतीने हाताळण्यास प्रारंभ केला आहे.

प्रतिष्ठा पणाला४तब्बल दहा वर्षानंतर आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रताप जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत आहे. दोघांमधील ही लढत जिल्ह्याचे आगामी १५ ते २० वर्षाच्या राजकारणीची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे या तुल्यबळ लढतीमध्ये कोण बाजी मारतो हे उत्सुकतेचे असले तरी दोघांच्याही प्रतिष्ठा येथे पणाला लागल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलढाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक