शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात आघाडी-युतीला समान संधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:35 IST

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आघाडी तथा युतीला मताधिक्य मिळविण्याची समसमान संधी आहे; मात्र छुपी गटबाजी दोन्ही पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते.

- नीलेश जोशी   बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात स्टार प्रचारकांनी प्रचार सुरू केला आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आघाडी तथा युतीला मताधिक्य मिळविण्याची समसमान संधी आहे; मात्र छुपी गटबाजी दोन्ही पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते.विशेष म्हणजे प्रचाराच्या गेल्या दहा दिवसात या क्षेत्रात कुठलीही मोठी सभा उभय बाजूने घेतल्या गेली नाही; किंबहुना येत्या काळातही जिल्हा मुख्यालयी अशी सभा होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणचेच मतदार एक प्रकारे अडगळीत टाकण्याची भावना व्यक्त होत आहे.मोठ्या सभा या विधानसभा क्षेत्रात नसल्या तरी आघाडी-युतीच्या उमेदवारांकडून कॉर्नर सभा आणि मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहे. वाहनावरील एलसीडीद्वारे उभय बाजूंनी प्रचार होत असल्यामुळे निवडणुकांचा माहौल तयार होत आहे. विधानसभेतील सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ झाल्याचे चित्र असताना शिवसेनेंतर्गत गटबाजी असून, विकास कामे न झाल्याने काहीसा रोष आहे.युती । प्लस पॉइंट काय आहेत?चार निवडणुकांपासून बुलडाण्यात युतीला मताधिक्य आहे. जालिंदर बुधवत, संजय गायकवाड प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. सेनेसाठी लाभदायक मोताळा तालुक्याचा विधानसभेत समावेश.युती । वीक पॉइंट काय आहेत?बुलडाणा विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात आहे. पक्षांतर्गत गटबाजी आहे. विकास कामे अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे नाराजी, आरपीआय (आठवले) गटाच्या सहकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एक संघपणे प्रचार करत आहे. डॉ. शिंगणे स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सेनेसाठी नकारात्मक असलेल्या बाबी आघाडीच्या पथ्यावर पडणाºया आहेत.आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?राष्ट्रवादीचे संघटन कौशल्य तुलनेने कमी आहे. गेल्या काही वर्षांपासून बुलडाण्यात राष्ट्रवादीचा प्रभावी नेता नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारास अनामत रक्कम गमवावी लागली होती.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी ११,६६१ मते मिळवीत तत्कालीन मनसेचे संजय गायकवाड (३५,३२४ मते) यांचा पराभव केला होता़

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना