शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Lok Sabha Election 2019 :प्रचाराच्या उत्तरार्धास प्रारंभ; सभांचा धडाका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:50 IST

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. १६ एप्रिल रोजी प्रचार तोफा शांत होत असल्याने उरलेल्या अवघ्या नऊ दिवसामध्ये युती, आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या जवळपास १८ सभा जिल्ह्यात होत आहेत. दरम्यान, प्रचाराच्या पूर्वार्धात राजकारणामध्ये परस्परविरोधी टोकांवर असणारे युती व आघाडीच्या प्रचारात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. त्यामुळे अशा परस्परविरोधी धाटणीच्या नेत्यांद्वारे मतदारांचे कितपत परिवर्तन होईल, हाही निवडणुकीत चर्चेचा मुद्दा आहे.आता स्टार प्रचारकांच्या माध्यमातून मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून केला जाणार आहे या स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाक ७ एप्रिलपासूनच सुरू झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी माजी मंत्री फौजिया खान यांची बुलडाण्यात सभा झाली, तर शिवसेना नेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची मेहकर, साखरखेर्डा येथे ८ एप्रिल रोजी सभा होत आहे. मेहकरातही वंचित बहुजन आघाडीतर्फे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेने सुरुवात केली जाणार आहे. त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडून १० एप्रिल रोजी खामगावात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांचीही जाहीर सभा घेतली जाणार आहे. त्यानंतर १५ एप्रिललाही वंचित बहुजन आघाडीकडून एक महत्त्वाची जाहीर सभा घेतली जाण्याची शक्यता भारिप-बमसंच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, आघाडीकडून पुढील काळात १२ एप्रिल रोजी खामगावमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होईल. दहा एप्रिल रोजी नितीन बानगुडे पाटील यांची वरवट बकाल आणि जळगाव जामोद येथे सभा होणार आहे. त्यापाठोपाठ प्रचार तोफा थंडावण्याच्या एक दिवस अगोदर चिखलीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्याही येत्या काळात सभा होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री फौजिया खान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे आणि शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होणार आहे.  प्रचारात विकास आणि अकार्यक्षमतेचेच मुद्देप्रचाराच्या पहिल्या टप्प्यात युतीकडून ‘मोदी आणि विकास’, महामार्ग, सिंचन सुविधा, रेल्वे आणि एयर स्टाइक तथा स्पेस स्ट्राइक हे मुद्दे घेऊनच प्रचार केला जात आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपल्याला निवडून देण्यात यावे असा युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याकडून प्रचार होत आहे. आघाडीकडून विद्यमान खासदार असलेले जाधव यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवण्यात येत आहे. ही अकार्यक्षमता पाहता यंदा परिवर्तन निश्चित असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षात मोदींनी सामान्यांची केवळ फसवणूकच केली. त्यामुळे जनसामान्यांच्या कल्याणासाठी आघाडीला निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही कॉर्नर सभा आणि मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करत आहेत.प्रचार पातळी घसरतेयपूर्वाधातील प्रचारादरम्यान कॉर्नर बैठका व मतदारांशी थेट संवाद साधल्या गेला असला तरी काही ठिकाणी छोटेखानी सभा झाल्या आहेत. यामध्ये आघाडीकडील एक व युतीकडील दोघांनी प्रचारादम्यान खालच्या पातळीवर परस्परविरोधी टीका-टिप्पणी केली. निवडणूक रिंगणातील उमेदवार राहिले बाजूला; पण या सहकाऱ्यांनी प्रचारादरम्यान जीभेला लगाम लावणे गरजेचे झाले आहे. व्यक्तिगत स्तरावर जाऊन होणाºया या टीका-टिप्पणीची तीव्रता स्टार प्रचारकांच्या सभेदरम्यान प्रसंगी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेहकर नगराध्यक्षांविरोधात आधीच असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक