शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:09 IST

कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : सध्या एकीकडे कोरोना आजाराचा सामना सर्वजण करीत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर आता टोळधाड या कीटकांचे आव्हान उभे राहीले आहे. पिकांचे नुकसान करणाºया या कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.गुजरात, मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली. संग्रामपूर तालुका कृषी विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुका कृषी विभागाने पेरणीपूर्वीच जनजागृती सुरू केली आहे. मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातपुडा परिसरातील सायखेडा, हडीयामाळ, चिचारी, शिवणी, दयालनगर, वसाळी, पिगळी, सोनाळा परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी १२ ट्रॅक्टरवर कॉमप्रेशर यंत्र बसविण्यात आले असून फवारणी करण्यात येणार आहे.  

नेमकी कशी आहे टोळधाडआपल्याकडे आढळणारा नाकतोडा या कीटकासारखाच हा कीटक आहे. यांचा थवा पिकांचा फडशा पाडतो. एका तासात सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतराच्या क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येतो. सर्वच पिकांना हे हानीकारक आले. हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी हे कीटक खातात. टोळ तांबुस रंगाची असते. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वास्तव्य करतात. एक किलोमीटर चौरस क्षेत्रात टोळ असेल तर ३ हजार क्विंटल टोळीचे वास्तव्य राहते, अशी माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.कसे आणणार नियंत्रण!टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास नियंत्रण मिळविता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यानेही नियंत्रण मिळविता येते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथेल पॅराथीआॅन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयानी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावता येते.

गुजरात, मध्य प्रदेशात टोळधाडीचा जास्त प्रादुर्भाव आहे. सातपुडा पर्वत परिसरात टोळधाडीचा त्रास जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.- अमोल बनसोड,तालुका कृषी अधिकारीसंग्रामपूर

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी