लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी आंदोलनांची महाराष्ट्रभर व्याप्ती वाढलेली असून, सर्वपक्षीय कोअर कमिटीच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला ७ जून रोजी कुलूप ठोकण्यात आले असून, खामगाव येथील कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन •भवनाच्या मुख्य इमारतीचा दरवाजा बंद करत बुधवारी दुपारी टाळे लावण्यात आले. या इमारतीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची कार्यालये आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १७ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव आणि अन्य मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यानी संपाला सुरुवात केली आहे. या संपाला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, या संपाला पाठिंबा देण्यासाठी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा (लाल बावटा), शिवसेना आणि शेकाप अशा सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या गेटला कुलूप लावून ताला ठोको आंदोलन केले. २० मिनिट आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करून ठेवले होते. या आंदोलनात शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रा.अनिल अमंलकार, अ.•भा. किसान सभा जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोपडे, विप्लव कविश्वर, रामाचंद्र •भारसाखळे, मनोहर साठे, जयवर्धने रावणकर, संजय बाभुळकर, पुरुषोत्तम बाभुळकर, गोपाळ इंगळे, शेकापचे •भाई वानखेडे, कैलास काटे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. मध्यप्रदेश सरकारने कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याच्या घटनेचा निषेधही आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप!
By admin | Updated: June 8, 2017 02:32 IST