शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मुळे आरटीई प्रवेशासाठी मिळणार तीन संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:05 IST

कोरोनाच्या संसगार्मुळे पालक इकडे-तिकडे अडकले असल्यामुळे त्यांना प्रवेशासाठी तीन संधी दिल्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे शाळा उशीरा सुरू होत असून आरटीईच्या प्रवेशाचा आता मुहूर्त निघाला आहे. यंदा प्रवेशासाठी एकच संधी देण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या संसगार्मुळे पालक इकडे-तिकडे अडकले असल्यामुळे त्यांना प्रवेशासाठी तीन संधी दिल्या आहे.चालू शैक्षणिक वषार्साठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सध्यास्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहे. अशा सुचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आहेत.शाळेत आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिन विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले आहेत. या नावापुढे या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवायचे आहे, ती तारीख शाळेने टाकावी. त्याप्रमाणे पालकांना एसएमएस जातील. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेचे नियोजन करावे व कोणत्या तारखेला बोलावे हे शाळेने ठरवावे अश्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील २३१ नोंदणीकृत शाळांमध्ये २ हजार ७८५ जागा आरक्षीत असून ६ हजार ५१० आॅनलाईन अर्ज आले आहेत.

आॅनलाईन अभ्यासक्रमपालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, काही पालक मुळगावी किंवा अन्य काही स्थलांतर झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते पालक आले नाही तर त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, तसा एसएमएस पाठवावा. त्यांना दिलेल्या तारखेला ते उपस्थित न राहिल्यास तिसऱ्यांदा तारीख देण्यात यावी अशाप्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी. शाळेचे आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर अशा तात्पुरत्या प्रवेशित बालकांना लाभ देण्यात यावा. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा या बालकांना प्रवेश झाले असे समजून वर्गात बसण्याची मुभा द्यावी.

जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. तसे संदेशही त्यांच्या पालकांना दिल्या जात आहेत. त्यानंतर प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.- एजाज खानप्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा

 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव