शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन: चवथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात फज्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:36 IST

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पहिल्याच दिवशी उल्लंघन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडानच्या चौथ्या टप्प्याला १८ मेपासून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पहिल्याच दिवशी उल्लंघन झाले. शहरातील एका ओळीत पाच पेक्षा अधिक दुकाने सुरू असून, त्यावर गर्दीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली. रस्ते, दुकाने गजबजल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले लॉकडाउन १७ मे नंतर आता ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. लॉकडाउनचा हा चौथा टप्पा आहे. दुकानांची वेळही बदलण्यात आली आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यातही प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात कंटेनमेन्ट झोनमधील सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. किराणा, भाजीपाला, दूध, कृषी व बांधकाम साहित्य, सिलबंद मद्यविक्री आदी दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय आस्थापना, मेडीकल, लॅब, दवाखाने, रुग्णवाहिका सेवांसोबतच राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नगर पालिका क्षेत्राबाहेरील पेट्रोल पंप २४ तास सुरू राहणार आहेत.या भागात सलग पाच पेक्षा जास्त दुकाने एका ओळीत उघडी न ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी या आदेशाला बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी खो बसला आहे. बुलडाण्यात एका ओळीत सलग पाचपेक्षा जास्त दुकाने उघडी होती. एका दुकानांवर पाचच ग्राहक नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांची चांगली धावपळ झाली.

दुचाकींना बंदी; पोलिसांची धावपळलॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यामध्ये दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुचाकींना प्रतिबंधीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी १७ मे रोजी दिले. त्याची अंमलबजावणी १८ मे पासून होणे आवश्यक होते; मात्र आज सकाळपासून दुचाकींने रस्ते गजबजल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवासोबतच विनाकारण बाहेर पडणाºयांच्या दुचाकीही रस्त्याने सुसाट धावत आहेत. पोलिसांनी बुलडाणा शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त लावला. येणाºया प्रत्येक दुचाकीचालकाची चौकशी सुद्धा केली. परंतू प्रत्येकजण दवाखाना, किराणा सामान, औषधी यासरखे कारणे दखवत असल्याने पोलिसांचीच चिंता वाढली होती.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या