शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:24 IST

Buldhana Lockdown हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, जिल्ह्यात गेल्या १७ फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाला आठ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनसंदर्भातील अनेक नियम शिथिल केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार सायंकाळी सहा ते सकाळी  या कालावधीत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत अकारण रस्त्यांवर फिरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या आस्थापना या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू राहतील. मात्र शहरी तथा ग्रामीण भागात महसूल, पालिका व पोलिसांच्या पथकाकडून नियमित स्वरुपात तपासणी करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे बंदच राहणार असून हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल सुविधा देण्याची मुभा राहील. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, धाबे व गॅरेज सुरू राहतील.  सर्व वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सालये त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा ही २४ तास सुरू राहणार आहे. यासोबतच कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेऊन रुग्णांना सेवा नाकारणार नाही. तसेच दूध विक्रेते, दूध वितरण केंद्रे ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहेत. 

लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगीलग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी राहणार आहे. वधू व वराचाही यात समावेश असून, तहसीलदारांकडून त्यासाठी परवानगी मिळेल. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी गाड्यांमध्ये चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशांनाच मुभा राहील. आंतरजिल्हास्तरावरील बससेवा सुरू राहील; मात्र क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना त्यात प्रवेश दिला जाईल. ठोक भाजीमंडई सकाळी ३ ते ६ सुरू राहील. परंतु मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या