शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मद्यविक्रेत्यांची माहिती होणार अपडेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:24 IST

ज्य उत्पादन शुल्क विभागाने यादृष्टीने माहिती संग्रहीत करण्याचे काम तातडीने सुरु केले असून जिल्ह्यातील ४५८ तर अमरावती विभागातील २१५२ मद्यविक्रेते यामाध्यमातून अपडेट होणार आहेत.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची जोडणी संगणकीकृत यंत्रणेच्या माध्यमातून करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यादृष्टीने माहिती संग्रहीत करण्याचे काम तातडीने सुरु केले असून जिल्ह्यातील ४५८ तर अमरावती विभागातील २१५२ मद्यविक्रेते यामाध्यमातून अपडेट होणार आहेत. या प्रोसेसमुळे करचोरीला चाप बसेल अशी अपेक्षा आहे. अवैध मद्यविक्री, हातभट्टी निर्मितीमुळे महसुलात होणारी तूट टाळण्यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त छापे सुद्धा आगामी काळात टाकले जाणार आहेत. अनेक ठिकाणी अवैधरित्या मद्यविक्री होतांना दिसते. यामुळे अनेकांच्या आरोग्यालाही बाधा पोहचल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय शासनाचा मोठा महसूलही यामाध्यमातून बुडतो. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तेवढी सक्षम यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. यामुळे कारवाईस अडथळा निर्माण होत होता. या सर्व घटनांचा विचार करून शासनाने अनेक नाविण्यपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अवैध मद्यनिर्मितीच्या अनुषंगाने दाखल तक्रारीत शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय वाईन शॉपमधून सिलबंद मद्याच्या विक्रीत कमाल किरकोळ किंमतीचे (एमआरपी) सर्रास उल्लंघन होते. त्यावरही विशेष भर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देणार आहेत. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्यानंतर तातडीने यादृष्टीने उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी याबाबतचा आढावा घेतला. तर जिल्हयातील मद्यविक्रेत्यांची माहिती अपडेट करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्याचे निर्देश दिले आहेत.अवैध मद्यविक्रेत्यांची खैर नाहीअधिकृत मद्यविक्रेत्यांची माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही सर्व माहिती आॅ़नलाईन उपलब्ध होणार असल्याने अनाधिकृत विक्रेते आपोआपच समोर येतील. अनेक ठिकाणी बनावट दारू विक्रीही केली जाते. यासर्व प्रकारावर आगामी काळात नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन विभाग सरसावला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग