शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंधारलेल्या आयुष्यात नेत्रदानाचा प्रकाश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:10 IST

गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानातून अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागाकडून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात येते. या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अंध व्यक्तींना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानातून अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हा सामान्य रुग्लायातील नेत्र विभागात कार्यरत नेत्रदान समुपदेशकांच्या वतीने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह जिल्हाभरात नेत्रदानाबाबत जनजागृती करून त्यांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्यात येते. या माध्यमातून दिवसेंदिवस नेत्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक समोर येत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेल्या अंधश्रद्धेमुळे नेत्रदान करण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. मृत्यूनंतर आपण नेत्रदान केल्यास स्वर्गात गेल्यावर आपण आंधळे होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. नेत्रदानाबाबत असलेले सर्व गैरसमज दूर करून लोकांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम नेत्र विभागाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. जिल्ह्यात २०१९ ते आतापर्यंत अशा सव्वा वर्षाच्या कालावधील एकुण ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केले. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेत्रदान संकल्प पत्र देण्यात आले आहेत. याठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने संकल्पपत्र भरून देत आहेत. यासाठी समुदेशकांकडून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये विविध शिबिरांचे आयोजन करून ग्रामस्थांना याविषयी सविस्तर माहिती देण्यात येते. आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदान केल्यास आपल्या डोळ्यांनी अंध व्यक्तीच्या माध्यमातून मृत्यूनंतरही आपण हे जग पाहू शकतो, ही बाबत सर्व सामान्यांच्या मनावर रुजविली जाते. परिणामी नेत्रदानाचा टक्का वाढत असल्याचे आशादायी चित्र सध्या निर्माण झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा