शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

...या लाइफस्टाईलचं होतंय सध्या कौतुक; शेतात घरे करून राहणारे नागरिक ठरताहेत सुरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:38 IST

घाटाखाली खामगाव, नांदुरा, आणि मलकापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातच घरे करून राहण्याची एक पध्दत आहे.

-देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स  सध्या महत्त्वाचे मानले जात आहे. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत प्रशासनाच्या सूचना आहेत. या सगळ्या प्रक्रियेत सध्या अत्यंत सुरक्षित आहेत, ती शेतात घरं करुन राहणारी माणसे! घाटाखाली खामगाव, नांदुरा, आणि मलकापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातच घरे करून राहण्याची एक पध्दत आहे. सध्या या लाइफस्टाईलचं प्रचंड कौतुक होत आहे. कोरणा व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. भारतालाही याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. अगदी बुलढाणा जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास दिवसेंदिवस संशयित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. देशात लॉकडाऊन सुरू आहे. काम नसताना घराबाहेर फिरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. कोरोनाला हरवायचे असेल तर सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच सर्वात मोठा उपाय असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे इतक्यात देण्यात येत असले, तरी अनेकांनी या सोशल डिस्टन्सिंगला आपली संस्कृतीच बनवली असल्याचे जिल्ह्यात दिसून येते. खामगाव, मलकापूर, आणि नांदुरा तालुक्यात गत अनेक दशकांपासून शेतात घरे करून राहण्याची एक पद्धत आहे. स्वत:हूनच लावून घेतलेली ही सवय सध्याच्या वातावरणात सुरक्षितता प्रदान करणारी ठरू लागली आहे. खामगाव तालुक्यात हिवरा, मांडका, नांदुरा तालुक्यात पोटळी, मलकापूर तालुक्यात घिरणी, बेलाड आदी गावांमध्ये सुमारे निम्मे लोक शेतातच घर करून राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या नागरिकांची ही लाईफस्टाईल सध्याच्या काळात अत्यंत सुरक्षित असल्याचे दिसून येते. 

 अर्थकारणाशी जोडला संबंध!शेतात घरे करून राहिल्यामुळे गावातील लोकांचा संबंध येत नाही. परिणामी गावातील रिकामटेकड्या गप्पांमध्ये रमणे नाही. शिवाय आसपास दुकाने नसल्यामुळे मुलांना तंबाखूसारखी व्यसने जडत नाहीत. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत शेतातील कामातच लक्ष  असते. पर्यायाने शु्ल्लक बाबींवरील खर्च टाळल्या जातो. दिवसभर शेतात राबत असल्याने उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने याची मदत होते. वातावरण शुध्द असल्याने आरोग्यही चांगले राहत असल्याचे नागरिक सांगतात. 

 माझ्या आजोबांपासून शेतातच राहण्याची पध्दत आहे. आमच्या गावातील इतर निम्मे लोकांची घरेसुध्दा शेतातच आहेत. शुद्ध हवा, निसर्गरम्य वातावरण यामुळे प्रसन्नतेचा अनुभव येतो. वसंता चित्रंगबेलाड, ता. मलकापूर

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस