शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी खुनासाठी आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: January 24, 2017 19:31 IST

घरगुती वादावरून २३ मार्च २०१५ रोजी पत्नी, सासू व आठ वर्षीय मुलीची हत्या करणाºया संतोष भाडाईत याला

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 24 - घरगुती वादावरून २३ मार्च २०१५ रोजी पत्नी, सासू व आठ वर्षीय मुलीची हत्या करणाºया संतोष भाडाईत याला बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच हजार रूपये दंडही ठोठावला. इसोली येथील आरोपी संतोष प्रल्हाद भाडाईत याला दारू पिण्याची सवय होती. तो पत्नी गीताला मारहाण करीत होता. त्यामुळे गिता माहेरी सवणा येथे आई
विमल व मुलगी आरती यांच्यासमवेत राहत होती. घटनेच्या दोन महिने पूर्वीपासून संतोष सवणा येथे राहण्यास आला होता. २३ मार्च २०१५ ला रात्री ८.०० वाजता संतोषने पत्नी व सासूसोबत भांडण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मध्यरात्रीला पत्नी व सासू विमलबाई यांच्या डोक्यावर फावड्याने मारहाण करून त्यांना ठार केले. त्याचवेळी मुलगी आरती झोपेतून उठून जोरजोराने रडायला लागली म्हणून आरोपीने तिच्याही डोक्यात फावड्याने वार करून तिला ठार केले व घराला बाहेरून कडी लावून पळून गेला.
याप्रकरणी गिताचा भाऊ गजानन मोतीराम गाढवे यांनी चिखली पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संतोषविरूध्द भादंवीचे कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांनी केला व तपास पुर्ण झाल्यानंतर प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र विष्ट यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात
आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदारांचे साक्षी-पुरावे नोंदविण्यात आले. मयताचे भाऊ, शेजारी, डॉक्टर व तपास अधिकारी या सर्वांची साक्ष विचारात घेवून विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश विष्ट यांनी यांनी २३ जानेवारी १७ रोजी आरोपी संतोष यास जन्मठेप व १००० रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना कारावास अशा प्रकारची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.सोनाली सावजी देशपांडे सरकारी वकील बुलडाणा यांनी काम पाहिले. तसेच साक्षीदार, तपास अधिकारी व डॉक्टर यांची साक्ष जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.अमोल बल्लाळ यांनी नोंदविली. (प्रतिनिधी)