मलकापूर (जि. बुलडाणा): महिलांचे वस्त्र परिधान करून ट्रकचालकाला मारहाण करून लुटमार करण्यात आल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री ३ ते ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ नांदुरा रोडवरील खालसा धाबा ते कलकत्ता धाबा दरम्यान घडली. या घटने तील आरोपींना मलकापूर शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. रामदास पुंडलिक रणित (३0 रा. वडनेर भोलजी) व कैलास राजाराम दांडगे (२४ रा. धानोरा) अशी आरोपींची नावे असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेतले असता, त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत ट्रक (डब्ल्यू.सी. २३ सी ८00९) चा चालक नितेश महेशी यादव (२२ रा. आबदपूर ता. मगरम, बिहार) याच्याकडून आरोपींची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी आसपास शोध घेतला असता, घटने तील आरोपीचे ज्ॉकेट आढळून आले. या ज्ॉकेटची झडती घेतली असता, खिशातून मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानंतर ट्रकचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वेशांतर करून लुटणारे अटकेत
By admin | Updated: January 7, 2016 02:18 IST