शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस बोनस प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू - खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:40 IST

बुलडाणा :  राज्यभरात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 खरेदी केंद्र सुरू झाली असून, राज्यातील कापूस उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्यावर प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती कृषी तथा फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देसोयाबीनच्या भावासाठी पीक कापणी प्रयोगाचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  राज्यभरात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 खरेदी केंद्र सुरू झाली असून, राज्यातील कापूस उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्यावर प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती कृषी तथा फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, सोयाबीनच्या भावासंदर्भात शेतकर्‍यांमधील रोष पाहता पीक कापणी प्रयोगातील अँव्हरेजचा आधार घेत भाव ठरवला जावा, असे आपण सुचित केले असल्याचे ते म्हणाले.बुलडाणा बाजार समितीमध्ये मूग, उडीद सोयाबीन शासकीय हमी भाव खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ते बुलडाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कृषी विभागातील अधिकार्‍यांची विश्रामगृहामध्ये बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते.दरम्यान, गुजरातमध्ये हमीदराच्यावर प्रतिक्विंटलला ५00 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकर्‍यांना असा काही बोनस जाहीर करण्याची शक्यता आहे का? याबाबत त्यांना विचारले असता मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत संबंधित विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. सोयाबीन शेतमालाची हेक्टरी १५ क्विंटल खरेदी करणात येणार असून, हमी भाव ३,0५0 रुपयाप्रमाणे खरेदी करण्यात येईल, असे त्यांनी बुलडाण्यातील बाजार समितीमधील कार्यक्रमादरम्यान सांगितले.दुसरीकडे राज्यात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 केंद्र सुरू झाले असून, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, देऊळगाव राजा आणि शेगाव येथे केंद्र सुरू झाले आहेत. यापैकी शेगाव वगळता अन्य केंद्रावर आतापर्यंत ५८  क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. चार हजार ३२0 रुपयांचा भाव कापसाला सध्या दिला जात असल्याचे कापूस पणन महासंघाचे खामगाव येथील विभागीय व्यवस्थापक तोवर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती