शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातून शोषित, पीडितांच्या दु:खांचे हुंकार उमटू द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:37 IST

साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  साहित्यात कल्पनारम्य जगाचे चित्रण करण्यापेक्षा  वास्तवाचे भेदक चित्रण करणे गरजेचे आहे. साहित्यिकांनी वास्तववादी लेखन करताना आपल्या साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.अंकुर साहित्य संघ व म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथील भूमिपुत्र स्व.भाऊसाहेब फुंडकर साहित्य नगरी (कोल्हटकर स्मारक मंदीर) येथे ५८ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आशुतोष अडोणी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अनिता डवरे, साहित्यिक अशोक राणे, भाजप मिडीया सेलचे प्रदेश सदस्य सागर फुंडकर, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, उर्मिलाताई गायकी, भगवानसिंह सोळंके, कविता वडोदे, रेखा शेगोकार, महादेवराव भोजने, केदार एकडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना वडोदे पुढे म्हणाले की, मनोरंजनाच्या हेतूने केलेले लेखन मागणीशी तडजोड करणारे व वास्तवापासून दूर असते. आपल्या कथा, कविता, कादंबरी आदी लेखनाच्या माध्यमातून व्यक्तिगत जीवनातील सुखदु:खे जाणून घेण्याची, व्यक्ती आणि समाज यातील संघर्षाचे चित्रण करण्याची प्रवृत्ती आढळली पाहिजे. वेगळ्या वाटा शोधणारे लेखन सद्यस्थितीत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक अरविंद भोंडे यांनी केले. संचालन सैय्यद अहमद, किर्ती बढे यांनी केले. आभार साहित्यिक रमेश डोंगरे यांनी मानले.  सुरूवातीला स्वागताध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या शुभसंदेशाचे वाचन किर्ती बढे- सांगळे यांनी केले. यावेळी महादेव बगाडे, अरूण भगत, रामेश्वर जोहरी, संदीप गावंडे, विनय वरणगावकर, शालीग्राम वाढे, प्रा. देवबा पाटील, अ‍ॅड. रजनी बावस्कार, किरण रेठेकर, सुरेश साबळे, सुरेश लोंढे, रघुनाथ खेर्डे, उर्मिला ठाकरे, आर.आर. होनाळे आदी साहित्यिकांची उपस्थिती होती.

 विविध पुस्तकांचे प्रकाशनसाहित्य संमेलनाच्या अनुषंगाने साहित्य संमेलन विशेषांक शंब्दाकूरचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘नसून अडचण असून खोळंबा’ या कथासंग्राहाचे आणि उद्वेग, कठिण सत्य, माउली आदी पुस्तकांचेही  विमोचन यावेळी झाले. त्यानंतर अंकुर पुरस्कार २०१८ चे वितरण करण्यात आले.