शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खामगाव विभागात सुकन्या समृद्धी योजनेकडे पालकांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:34 IST

खामगाव:  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत  टपाल खात्यात मुलींसाठी बचत खाते उघडण्यात येणार्‍या सुकन्या समृद्धी योजनेकडे खामगाव विभागात पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मागील दहा महिन्यात केवळ १,0७३ पालकांनीच मुलीच्या नावे बचत खाते उघडल्याची माहिती पोस्टाच्या खामगाव येथील मुख्य कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यंदा ८.१ एवढा व्याजदर असूनही पालक आपल्या मुलींच्या नावे बचत खाते उघडण्यास अनास्था दाखवत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्देदहा महिन्यात केवळ हजार पालकांनी उघडले खाते 

भगवान वानखेडे । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत  टपाल खात्यात मुलींसाठी बचत खाते उघडण्यात येणार्‍या सुकन्या समृद्धी योजनेकडे खामगाव विभागात पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मागील दहा महिन्यात केवळ १,0७३ पालकांनीच मुलीच्या नावे बचत खाते उघडल्याची माहिती पोस्टाच्या खामगाव येथील मुख्य कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यंदा ८.१ एवढा व्याजदर असूनही पालक आपल्या मुलींच्या नावे बचत खाते उघडण्यास अनास्था दाखवत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सुकन्या समृद्ध योजनेंतर्गत मुलींच्या नावे पोस्टात बचत खाते उघडून तिच्या भविष्यासाठी निधी जमा करण्याची ही योजना आहे. मुलगी हे खाते वय वर्षे १८ अथवा २१ किंवा लग्न होईपर्यंत खाते सुरू ठेवू शकणार आहे. चालू आर्थिक वर्षात मुलींसाठी असलेल्या  समृद्धी सुकन्या योजनेंतर्गत खात्यावर ८.१  टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. समृद्धी सुकन्या योजना ही मुलींसाठीची  विशेष ठेव योजना आहे. आर्थिक वर्ष २0१८-१८ या वर्षात समृद्धी सुकन्या खात्यात ठेव म्हणून ठेवल्या जाणार्‍या ठेवीवर  ८.१ टक्के दराने व्याज दिले जाण्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे समृद्धी सुकन्याद्वारे मुलींच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक गरजा भागविता येणार आहेत. असे असतानाही मात्र खामगाव विभागातील १६ कार्यालयात दहा महिन्यात केवळ १ हजार ७३  पालकांनी खाते उघडले आहेत. यावरून या योजनेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

अशी आहे सुकन्या योजनामुलगी दहा वर्षांची होईपर्यंत तिचे आई-वडील समृद्धी सुकन्याचे खाते उघडू शकतात. एका मुलीचे एकच खाते उघडले जाऊ शकते. दोन मुली असतील, तर पालक प्रत्येकी एक याप्रमाणे दोन खाते उघडू शकतात. जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील, तर त्या प्रमाणात एकाच वेळी दोन अथवा तीन खाती उघडता येऊ शकतात. ही खाती शक्यतो टपाल खात्यात अथवा सरकारकडून सांगण्यात आलेल्या सरकारी बँकांमध्येच उघडता येऊ शकतात. या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय किमान दहा वर्ष असणे गरजेचे आहे. सध्या मुलीचे अकरा वर्षे असेल, तर चालू वर्षातच तिला खाते उघडता येईल. ही सवलत केवळ यावर्षीच उलब्ध आहे.

सुकन्या समृद्ध योजना ही मुलींच्या भविष्यासाठी लाभदायक अशी योजना आहे. या योजनेत खाते उघडून मुलीच्या भवितव्य उज्वल करावे. -सी.एल. गोसावी, पोस्ट मास्तर, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव