शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बोरजवळा येथे  बिबट्याचा धुमाकुळ, दोन गायींचा पाडला फडशा!

By अनिल गवई | Updated: April 4, 2023 16:17 IST

नागरिकांमध्ये दहशत: बैलगाडी चालणार्या कुत्र्यालाही नेले उचलून

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जंगलातील पाण्याच्या तुटवड्यामुळे वन्यजीवांची नागरी वस्तीकडे धाव आहे. खामगाव तालुक्यातील बोरजवळा शिवारात गत काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुळ वाढला असून, रविवारी एका बिबट्याने शेतकर्यांच्या दोन गायींचा  फडशा   पाडला. तर बैलगाडीसोबत चालणार्या एका कुत्र्यालाही मक्याच्या शेतात उचलून नेले. त्यामुळे बोरजवळा शिवारात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली असून भीतीपोटी शेतमजुरांनी शेतात कामाला जाण्याचेही बंद केल्याची चर्चा आहे.

बोरजवळा शिवारातील रमेश मुर्हे, गणेश इंगळे यांच्या शेतात गत काही दिवसांपासून बिबट्या तळ ठोकून आले. चराईला जाणार्या जनावरांची शिकार करीत बिबट्या निर्जनस्थळी नेऊन ती जनावरे  फस्त करतो. गत आठवड्यापासून िबबट्याचा हा नित्यक्रम झाल्याने शेतकर्यांसोबतच शेत मजूरांनीही शेतात जाणे बंद केले आहे. रविवारी बिबट्याने गावातील दोन शेतकर्यांच्या दोन गायी  फ स्त केल्या. तर बैलजोडी सोबत घरी जाणार्या एका शेतकर्याचा एक कुत्राही बिबट्याने उचलून नेला. यावेळी बालंबाल बचावलेला शेतकरी चांगलाच भेदरला आहे.  बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शिवारातील शेतीची कामे रखडली असून, बोरजवळा येथील मोहनसिंह तोमर, राजू इंगळे, गणेश इंगळे, रमेश मुर्हे, दीपक जाधव आदी शेतकर्यांनी िबबट्याला पाहीले असून, याबाबत वनविभागाकडे तक्रार केली आहे. शिवाय बोरजवळा शिवारात ठिकठिकाणी बिबट्याचे पगमार्क दिसून येत आहेत.सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष० िबबट्याच्या दहशतीबाबत संतप्त गावकर्यांकडून वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. मात्र, वनविभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. वन विभागाचे अधिकारी  फ ो नही उचलत नसल्याचा आरोप शेतकर्यांचा आहे.

मक्याची कापणी, मशागत रखडलीबिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकर्यांची गहू, मका कापणी रखडली आहे. त्याचवेळी शेतीची मशागतही रखडली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये वनविभागाच्या चालढकल वृत्तीबाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.