शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोहज शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

By संदीप वानखेडे | Updated: June 3, 2024 12:47 IST

दाेन शेळ्या, एका कुत्र्याची केली शिकार : जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू

संदीप वानखडे, रुईखेड मायंबा : परिसरातील माेहज मायंबा येथे शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला, तसेच दाेन शेळ्या आणि एका कुत्र्याची शिकार केली. ही घटना २ जून राेजी रात्री घडली. जखमी शेतकऱ्यावर धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकऱ्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.मोहोज मायंबा येथील शेतकरी शामराव साळवे (वय ६५) हे मोहोज शिवारातील आपल्या शेतात २ जून राेजी रात्री झोपायला गेले हाेते.

रात्री दोन वाजेदरम्यान बिबट्याने शेळीवर आणि सोबत असलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यांना वाचविण्यासाठी साळवे यांनी आरडाओरड केली असता त्यांच्यावरसुद्धा बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण वेळीच परिसरातील लाेक त्यांच्या मदतीला धावल्याने बिबट्याने तेथून पळ काढल्याने ते सुदैवाने बचावले. मोहोज येथीलच सांडू इंगळे या शेतकऱ्याचेसुद्धा एक शेळीचे करडू बिबट्या घेऊन गेला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले साळवे यांच्यावर धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शाेधात गावाकडे येत आहेत. परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या