शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 11:25 IST

लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने लोणार सरोवर परिसर पावन झाल्याची धारणा या भागातील नागरिकांमध्ये असून लोणार सरोवर परिसराची जवळपा सव्वा महिना त्यांनी तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका येथे सांगितल्या जाते. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील श्रीराम वनगमन संस्थेच्या सदस्यांशी संशोधनाच्या दृष्टीने लोणार येथे दोन वर्षापूर्वी भेट दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.यास लोणार येथील सरोवर अभ्यासक तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुरेश मापारी यांनीही दुजोरा दिला आहे. यापूर्वी २० नोव्हेंबर २०१८ मध्ये या संस्थेनेने लोणार येथे भेट दिली होती, अशी माहिती मापारी यांनी दिली. लोणार सरोवर परिसरातील माहिती या भागात प्रचलीत असलेल्या कथांच्या संदर्भानेही त्यांनी या समितीला माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमीपुजन पाच आॅगस्ट रोजी झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोणार संदर्भात माहिती घेतली असता ही बाब समोर आली.दरम्यान, लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते. संक्दपुराण, पद्मपुराण, रायमायणासारख्या ग्रंथातून लोणारचे सरोवर हे कृतयुगामध्ये निर्माण झाल्याचे संदर्भ येतात, असे सांगण्यात येते.वाल्मिकी रामायणामध्ये लोणार सरोवराला ‘पंचाप्सर सरोवर ’ म्हणत असे संदर्भ येतात तर महाकवी कालिदास रचित ‘रघुवंश’ या ग्रंथामध्येही याला पंचाप्सर सरोवर म्हंटले असल्याचे डॉ. मापारी यांनी सांगितले. वैज्ञानिक दृष्टीकोणातून विचार करता लोणार सरोवराची निर्मिती ही ५० हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रभू श्रीरामचंद्र तीर्थयात्रेसाठी लोणारला आले होते.

सव्वा महिना लोणार परिसरात चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळात जवळपास सव्वा महिना लोणार परिसरात त्यांनी वास केल्याचे सांगितले जाते. लोणार येथे विरजतिर्थ धार, पापहरेश्वर तिर्थ, कमळजा मातेचे दर्शन, घेतल्याची अख्यायिका आहे. रामगया येथेही काही काळ वास केला होता. त्यानंतर येथे मोठे हेमाडपंथी मंदिर निर्माण झाले. त्याला रामेश्वर महादेव मंदिर असे नाव आहे. आज येथे असलेल्या श्रीराम कुंडालाही एक मोठे महत्त्व आहे. रामगया येथे त्यांनी वडिलांचे श्राद्ध केले होते.

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवरcultureसांस्कृतिक