शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीचा वाडी-वस्तीवर प्रकाश; साखळी ग्रामपंचायतचा उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:53 IST

बुलडाणा: तालुक्यातील साखळी बु. गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी-वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती. साखळी बु. ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली.

बुलडाणा: तालुक्यातील साखळी बु. गावापासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या वाडी-वस्तीवर आतापर्यंत विद्युतची व्यवस्था नव्हती. साखळी बु. ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली. वाडी-वस्तीवर एलईडीचा प्रकाश पोहचल्याने ग्रामस्थांच्या चेहºयावर आनंद दिसून आला. आजही अनेक भागात विद्युत दिवे लागत नसल्याने रात्रीला अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. तालुक्यातील साखळी बु. पासून जवळ असलेल्या पिराचा मळा व भोरकडे वाडी येथे सरपंच विजया अनिल कोळसे यांनी काही दिवसांपूर्वी भेट देवून वाडीवरील समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, या परिसरात विद्युतची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सरपंच विजया कोळसे यांनी दिवाळीपर्यंत वाडी-वस्तीचा संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्याचा संकल्प केला. ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातून व काही पैशांची जुळवा-जुळव करून पिराचा मळा व भोरकडे वाडी या भागात दिवाळीच्या मुहूर्तावर एल. ई. डी. लाईट लावले. सरपंच विजया कोळसे, माजी सरपंच सुरेश चौधरी, बंडू देशमुख यांनी लाईटचे उद्घाटन केले. यावेळी उपसरपंच गजानन जुमडे, रमेश वाघमारे, सुरेश भोरकडे, सुगदेव भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप चौधरी यांनी परिसरात समस्या मांडल्या. वाडी वस्तीत लाईट लागल्याने नागरिकांना समाधान व्यक्त करून अलका भागवत यांनी यांनी सरपंच विजया कोळसे यांचा सत्कार केला. 

कचरा उचलण्यासाठी घेणार ट्रॅक्टरचा आधारग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल उचलण्यात येत आहेत. साखळी बु. ग्रामपंचायतने गावातील कचरा उलण्यासाठी घटांगाडी म्हणून व ग्रामपंचायतच्या इतर कामासाठी चौदाव्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपुर्ण गावातील कचरा दररोज उचलण्यात येणार असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच विजया कोळसे यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत