- नीलेश जोशी
बुलडाणा: विदर्भ मराठवाड्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पद्मावती (मासरूळ) आणि करडी धरणातून होत असलेल्या गळती प्रकरणी आता थेट धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंत्यांसह एक समितीच आता पाहणी करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही धरणांना धोका होण्यापूर्वीच अनुषंगीक उपाययोजना करण्याबाबात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता एन. सी. तायडे यांनी निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी आठ जुलै रोजीच उपरोक्त दोन्ही धरणातून गळती होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने प्रत्यक्ष धरणस्थळी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर लगोलग नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता यांच्याकडून प्रकरणी तातडीने मार्गदर्शन मागविण्यात आले होते. आठ जुलै रोजी पद्मावती अर्थात मासरूळ लघु प्रकल्प आणि करडी धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. त्या पृष्टभूमीवर लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.या प्रकारामुळे परिसरात भीतीदायक वातावरणही निर्माण झाले होते.
दुरुस्तीचे काम जिगाव प्रकल्प पूनर्वसन विभाग करणारया दोन्ही धरणातील गळती रोखण्यासाठी बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या अधिनस्त असलेल्या जिगाव प्रकल्प पूनर्वसन विभागातंर्गत येत असलेल्या शेगाव येथील जिगाव प्रकल्प प्रकल्प पूनर्वसन उपविभाग एककडे दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आललेली आहे. मध्यंतरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या समक्ष याबाबतचा निर्णय झाला असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
पद्मावती आणि करडी धरणाच्या गळतीची पाहणी करण्यासाठी धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता व अन्य अधिकाºयांचा सहभाग असलेली समिती २२ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहेत. संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याबाबतही धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता यांनी निर्देशीत केले आहे.- ए. एन. कन्ना(कार्यकारी अभियंता बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा)