शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून फरार कुख्यात चोरट्यास एलसीबीच्या पथकाने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:18 IST

Crime News रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना थांबवून त्यांना गणेश भारत फोलाने हा आरोपी लुटत होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एका जबरी चोरी प्रकरणात दोन वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यास चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांना थांबवून त्यांना हा आरोपी लुटत होता. त्याच्या अटकेमुळे चिखलीसह जिल्ह्यात झालेल्या काही लुटमारीच्या घटनांचाही छडा लागण्याची शक्यता आहे. गणेश भारत फोलाने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो चिखली शहरातील संभाजीनगरमधील रहिवाशी आहे. दरम्यान, तो चिखली शहरात आला असल्याची माहिती चिखली परिसरात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली असता, या पथकाने खारतजमा करून त्यास ताब्यात घेत चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.चिखली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा  मे, २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. चिखली शहरात बाजार समितीजवळून दुचाकीवर जात असताना कोलारा येथील श्रीकृष्ण मधुकर सोळंकी (२९) यांना अचानक एका व्यक्तीने थांबवून तंबाखूबाबत विचारणा केली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आणखी दोघे जण आले होते. दुचाकीस कट का मारला, अशी विचारणा करून सोळंकी यांच्या खिशातून रोख पाच हजार रुपये आरोपींनी काढून घेतले होते. प्रकरणी श्रीकृष्ण सोळंकी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार होता. मात्र, तो चिखली शहरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली असता, त्यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेत, चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या विरोधात चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे काही गुन्हे दाखल आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, नायक पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार, गजानन चतूर, विजय सोनोने, नदीम शेख यांनी ही कारवाई केली.गणेश भारत फोलानेच्या अटकेमुळे चिखली, मेहकर, देऊळगावराजा परिसरात झालल्या काही घरफोड्यांचाही तपास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी